नाशिक चा सिहंस्थ कुंभमेळा हा संपूर्ण देशाच्या धार्मिक आकर्षणाचा सोहळा आहे आणि तो बारा वर्षातून एकदाच येतो पण नाशिक शहराला हजारो करोडो ची देणगी देऊन जातो आणि हा बहुमान महाराष्ट्रात फक्त नाशिकलाच आहे. या उत्सवानिमित्त लाखो भाविक नाशिक शहराला विशिष्ट कालावधीत भेट देतात आणि त्त्यामुळे नाशिक शहराच्या विकासाला अधिकच हातभार लागतो म्हणून सर्वांनी सहकार्य करून हा धार्मिक सोहळा यशस्वीपणे पार पाडावा व प्रशासनाने देखील दुरगामी परिणामाचा विचार करून सोयी सुविधा निर्माण कराव्यात. हल्ली तपोवनातील सुमारे 1700 वृक्षांची तोड करून साधूग्राम तयार करण्याची जी योजना आहे याबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे. वृक्ष वल्ली या मानवाच्या सोबतीच नसून निसर्गाचा समतोल राखण्यास मोठी मदत करतात. परंतु साधूग्राम तर हवेचं पण ते जवळच एखादी जागा कायमस्वरूपी अधिग्रहण करून एकाद्या पर्यायी ठिकाणी पूर्ण सोयीसुविधानी युक्त असे साधूग्राम एकदाच निर्माण करावे आणि ते जर लांब अंतरावर असेल तर इलेक्ट्रिक बसेस तैनात करून साधूना जाणे येण्याची व्यवस्था निर्माण करता आली तर त्यामुळे एक वैचारिक समतोल ही साधला जाईल आणि वैचारिक कटुता टाळता येईल. याबाबत प्रशासनाने सकारात्मक विचार करावा ,अन्यथा याचा नकारात्मक परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजाराम जाधव
माजी कामगार उपायुक्त, नाशिक विभाग