*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३४५ वा दिवस*
जागृतीच्या या प्रारंभीच्या अवस्थेत आधुनिक हिंदुस्थानातील स्वतंत्र आणि मुक्त विचारधारा काही प्रमाणात प्रकट होऊ लागली आहे. एका बाजूला विज्ञान सहस्र सूर्याच्या आभेने तळपत आहे. भौतिक शक्ती, घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म वेध घेत आहे. दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानची प्राचीन आणि संजीवक परंपरा, वैभवाच्या शिखरावर तळपत असताना हिंदुस्थानच्या श्रेष्ठ विचारवंतांनी व्यक्त केलेली विचारसंपदा; अनंत वर्षांपासून हिंदुस्थानच्या नसानसांतून वाहत असलेली वैश्विक प्रेमाची स्फूर्तिधारा, या सर्व परंपरेतील असामान्य पुरुषार्थ, अलौकिक बुद्धिमत्ता आणि असीम आध्यात्मिकता ही देवदेवतांनी हेवा करावा अशी आहे. एकीकडे हा गौरवशाली इतिहास तरुण मनाला भविष्याच्या आशेने भारून टाकत असतो; तर दुसरीकडे पाश्चात्य विज्ञानाचा झगमगाट त्याचे डोळे दिपवीत असतो.
*स्वामी विवेकानंद...*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर श्रावण ६ शके १९४८*
★ आषाढ शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. २८ जुलै २०२६
★ १९७९ भारताच्या पाचव्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची निवड.
★ २००१ आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
★ २०१६ पद्मश्री, पद्म विभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भारताच्या सुप्रसिध्द बंगाली लेखिका, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक हिपॅटायटीस दिन.
*संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*