असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य रविवार, १४ जून २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य रविवार, १४ जून २०२६
  • Positive News
  • जून 13 2026

Share on  

 असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य रविवार, १४ जून २०२६


अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी / अमावस्या. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००

 आज वर्ज्य दिवस आहे.

 नक्षत्र - रोहिणी / रात्री १०.१४ नंतर मृगशीर्ष.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ. (धृती योग, शंकुनि व चतुष्पाद करण)

 दर्श अमावस्या.

 चंद्र लाभ शनी.

टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) द्वितीय स्थानी चंद्र असल्याने आर्थिक व्यवहारात यश मिळेल. बोलण्यात संयम ठेवा. कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल. अमावस्येमुळे महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलणे हितावह ठरेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-शनी लाभयोगामुळे संयम आणि नियोजनातून यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाची कामे शांतपणे पूर्ण करा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र असल्याने खर्च वाढू शकतो. मानसिक तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासात सावधगिरी बाळगा. ध्यान आणि उपासना लाभदायक ठरेल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) लाभ स्थानी चंद्र असल्याने आर्थिक आवक वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) दशम स्थानी चंद्र असल्याने कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील पण त्यांचे योग्य व्यवस्थापन कराल. व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरतील.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) भाग्यस्थानी चंद्र असल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अष्टम स्थानी चंद्र असल्याने आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. संयमाने वागल्यास अडचणी दूर होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) सप्तम स्थानी चंद्र असल्याने वैवाहिक जीवनात समजूतदारपणे वागा. भागीदारीच्या कामात लाभ संभवतो. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नवीन संबंध लाभदायक ठरतील.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) षष्ठ स्थानी चंद्र असल्याने कामाचा ताण वाढू शकतो. विरोधकांवर विजय मिळवाल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित कामातून लाभ मिळेल. संयमाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) पंचम स्थानी चंद्र असल्याने संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना लाभदायक दिवस आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र असल्याने घरगुती विषयांना प्राधान्य द्यावे लागेल. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. मानसिक समाधान लाभेल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) तृतीय स्थानी चंद्र असल्याने पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. संवाद कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. लहान प्रवास लाभदायक ठरतील. नवीन व्यवहारात यश मिळेल.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या