नमस्कार,
मी अंजली जाधव . आपण सर्वजण मला अल्टरनेटिव्ह थेरपी हीलर आणि ट्रेनर म्हणून ओळखता . परंतु आज मी वेगळ्याच विषयावर आपल्याशी बोलणार आहे. तर मंडळी रोज सकाळी उठल्यावर हातात वर्तमानपत्र घेतल की आपल्याला दिसतात अपघात, खून, दरोडा ,मारामारी , बलात्कार, आर्थिक घोटाळे,राजकीय वाद विवाद, आरोप प्रत्यारोप याविषयीच्या बातम्या.....तसेच टीव्ही सुरू केला की तिकडे देखील तशाच बातम्या... सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच सर्व पाहून आपलं मन खिन्न होऊन जातं. हे सर्व पाहून तुम्हाला पण असंच वाटत ना की जगात काही चांगलं घडतय की नाही?
प्रत्येक नवीन सकाळ ही आपल्या जीवनात काहीतरी सुखद बातमी घेऊन यावी अशी आपली सर्वांचीच माफक इच्छा असते हो की नाही? पण सकाळी सकाळी अशा खिन्न बातम्या वाचून आपला दिवस नक्की कसा जाणार आहे हा यक्ष प्रश्न माझ्याप्रमाणेच तुम्हालाही पडत असेल ना? माझ्याप्रमाणेच आपल्यापैकी बरेच जण परदेशात फिरायला जात असता तेव्हा तिथे खूप काही सकारात्मक गोष्टी पहायला मिळतात ....जसे की स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्तबद्धता ,सुरळीत वाहतूक व्यवस्था ,आणि हो पादचारी लोकांना रस्ता क्रॉस करता यावा म्हणून चक्क थांबून राहणारे वाहन चालकसुध्दा .मग मनात असा विचार येतो की हे आपल्या देशात का होऊ शकत नाही ? असो आपण जग तर बदलू शकत नाही पण काहीतरी सकारात्मक करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न तर करूच शकतो. सकारात्मक विचार ही निरोगी आणि यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. सर्वांचे सकारात्मक विचार आणि निरोगी आयुष्य ही भारत देशाची मोठी शक्ती आणि संपत्ती होऊ शकते. यासाठीच जागतिक महिला दिनी आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत ....द पॉझिटिव्ह न्यूज वर्ल्ड . या सकारात्मक बातम्यांच्या जगात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. हे केवळ आमचेच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांचे व्यासपीठ आहे. तुम्हाला देखील जे जे सकारात्मक वाटते ते ते आम्ही या व्यासपीठावर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू.
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला The positive news World या website वरील about us मधील email वर आणि you tube , इंस्टाग्राम , लिंक्ड इन, ट्विटर वरील comment box मध्ये जरूर कळवा. धन्यवाद :blush::pray:
ई-मेल: positivenews25@gmail.com
कार्यालयाचा पत्ता: नाशिक