येत्या जागतिक वसुंधरा दिना निमित्त.... 

येत्या जागतिक वसुंधरा दिना निमित्त.... 
  • Positive News
  • एप्रिल 11 2025

Share on  

येत्या जागतिक वसुंधरा दिना निमित्त.... 


माणूस किती गोंधळलेल्या अवस्थेत जगत असतो, ह्या उदाहरणाने आपण सुरुवात करूया. ज्यावेळेस तो बाहेरगावी जातो त्यावेळेस तो घरगुती अन्नाच्या शोधात असतो आणि घरी असल्यानंतर त्याला हॉटेल मधलं अन्न  पाहिजे असत.
आपल्याला तसच म्हणता येईल आपल्या वसुंधरेच्या, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या बाबतीत. आज आपण बऱ्याच वेळा ऐकतोय, वाचतोय की मंगळावर, चंद्रावर आपण पाण्याच्या शोध लावण्याचा प्रयत्न कयतोय. म्हणजे आपल्या धरतीवरचं पाणी, ते कसं वाचवायचं याचे आराखडे लावायाचे सोडुन, आपण नेमकं आपल्यापासून कोसो दूर असलेल्या या ग्रहांवर त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीला धक्का देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या धरतीवर जे काही निसर्गाने भरभरून मुबलक अशा गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा एकीकडे आपण विकासाच्या नावाखाली ओरबाडून कसा नाश करतो आहोत, त्याबाबतीत आपण थोडं अत्मरीक्षण केलं तर, काही गंभीर गोष्टी आपल्या लक्षात येतील. आपण ह्या पृथ्वीवरच्या विविध देशांच्या काही विकासाच्या गोष्टी बद्दल बोलत असतो. उदाहरणार्थ, आपण दुबईच्या "बुर्ज खलिफा" इमारतीविषयी भरपूर वाचले ऐकले आणि बरेचसे पर्यटक खास ते बघण्यासाठी दुबई येथे गेले आणि जात असतात. पण जगाच्या पाठीवर मानवाने कुठे नवीन निसर्गाने नटलेला‌ "मानव निर्मित डोंगर" तयार केला आहे, आणि तो बघण्यासाठी पर्यटन सुरू आहे,असं कधी ऐकण्यात आलं नाही. 
अशाच बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे म्हणजे मानवाकडे इन्ट्रास्ट्रक्चर( विविध प्रकारच्या मशीन)उपलब्ध असल्याकारणाने आपण लांब सडक रस्ते अगदी दोन-चार वर्षात पूर्ण करतो, मोठमोठे पूल आपण बांधतोय, बोगदे करतोय, ईमारती बाधतोय, नको त्या ठिकाणी रोप वे, फार्म हाऊस बांधतोय. पण हे करत असताना नेमकं आपण काय काय कायमस्वरूपी हरवून बसतोय आणि काय मिळवतोय याच आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. आपण शंभर वेळेस या गोष्टीचा गांभीर्याने विचारकरण गरजेचे आहे ,की या विकासाच्या गोष्टी करत असतांना आपण जे काही निसर्गाने आपल्याला भरभरून मोफत दिले आहे, त्याच न भरुन निघणाऱ्या नुकसाना चा विचार न करता, त्याचा कसा सर्रास नाश करतोय आपण.
एखादी जुनी इमारत पाडून आपण नक्कीच त्या ठिकाणी पुनर्बांधणी करताना होती त्या इमारतीपेक्षा चांगल्या सोयीसुविधा असलेली इमारत बांधततो व बांधु शकतो. पण आपण जे सर्रास डोंगर फोडतोय, त्याच ठिकाणी आपण त्याच्या पेक्षा चांगला एखादा डोंगर पुनर्विकास करून उभारू शकतो का हो, त्याच्यावरची जैवविविधता आपण परत आणू शकतो का हो. तो डोंगर, त्यावरील नैसर्गिक साखळी, काही ठिकाणी जंगल उध्वस्त केले जातायेत,तो डोंगर ते जंगल आपल्यासाठी गुपचूप खूप काम करतात. ते आपल्याला कधी कळणार.
पण आपण फक्त सरळसोट रस्ते,  नको त्या ठिकाणी रोप वे, जमीनीचा मुळ ढाचा बिघडवून 
 फार्म हाऊस, इत्यादी बांधण्यासाठी मशगुल. त्याला पर्याय आहेत. त्या पध्दतीने आपण सुवर्ण मध्ये साधुन विकास करु शकतो. इथे मला कुठल्याही विकास कामांना विरोध करायचा नाही.‌पण विकास काम करताना आपण काय भान ठेवलं पाहिजे हे नक्कीच सांगणं गरजेचे.
 मी एक नक्की उदाहरण देईल.
इथे मला कोणा एकाला दोष द्यायचा नाही की  विरोध दर्शवायचा नाही, कारण इथं आपण सारेच आरोपी आहोत. जी नैसर्गिक संपत्ती आपल्याला मिळाली आहे व विकास ह्या दोन बाजू मांडण्यासाठी हे सांगणे खूप गरजेचे.
गेल्या काही वर्षांत भरपूर किलोमीटर रस्ते बांधले गेलेत, पुल बांधले, बोगदे झालेत, ईमारती इत्यादी. अश्या प्रकारचे भरपूर विकास कामे करण्यात आलेत. ते करत असतांना, नदी व नदी दुधडी भरून वाहण्यासाठी व धरण भरण्यासाठी गरजेचे असलेले नैसर्गिक नाल्यांचा विचार केला गेला नाही. चांगल्या शेत जमीनीचा विचार केला गेला नाही.
निसर्ग संपत्तीचा अतोनात रास झाला. तो झालेला रास पुन्हा स्थापित करण्यासाठी कुठलेही ठोस पाऊल, उचललेल्याच एक हि उदाहरण जगाच्या पाठीवर दिसत नाही.
आता तेच उदाहरणासाठी मी माझा स्व‌ अनुभव सांगतो आहे.
 आपली नाशिक देवराई,जंगल निर्मितीला सुरवात करून साधारणता दहा वर्ष होत येतील. आपण नाशिक देवराई शंभर एकर चा परिसरातील जंगल उभारणी सुरुवात केली ती ५ जून २०१५ ला. आणि नाशिक वनराई ५ जुन २०१६ आपण ह्या दोन्ही ठिकाणी कार्यक्रम घेतला पण त्या अगोदर दोन महिने अगोदर पासून आपल्याला कामाची सुरुवात आपण केली ह्या दहा वर्षात आपण नाशिक देवराई ७५ एकर व नाशिक वनराई ४० एकरपर्यंत जंगल निर्मितीकडे आजुन फक्त वाटचाल करत आहोत. पण त्याच नाशिक देवराई व नाशिक वनराई कडे माझ्या नेहमीच्या जाण्याच्या रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात टोले जंग इमारती चांगल्या सोयीसुविधानी उभ्या राहिल्यात इथं लोक राहण्यासाठी आलेत, काही शेकडो एकरच्या शेत जमिनीवर हे प्रकल्प उभे राहिलेत. त्यांना पूर्णत्वाचा दाखला पण मिळाला. ते उभे राहिले याचं दुःख नाही. पण ह्या गोष्टी आपण सहजासहजी व काही वेळेत करू शकतो हे इथे सांगणे आहे. पण तेच आज नाशिक देवराईचं व वनराईच जंगल निर्मितीचा पूर्णत्वाचा दाखला निसर्गाकडून मिळायला म्हणजेच ते जंगल परीपुर्ण व्हायला आपल्याला अजून कमीत कमी दहा वर्षे तरी लागतील. त्यात बऱ्याच धोक्यांना( वनवा, वृक्षतोड इत्यादी ) सामोरे जावे लागेल. 
म्हणजे हे उदाहरण एकीकडे निसर्ग जोपासायला आणि त्याचा शाश्वत विकास करायला किती कष्ट, जागरूकता आणि संयम लागतो किती साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण तेच मानवनिर्मित गोष्टी करण्यासाठी किती झटपट होतात आणि ते करत असताना आपण आपल्या नैसर्गिक साधनांचा मुजोरपणे किती नाश करतोय याचा विचार होणं गरजेचं आहे.
तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ह्यांचे शाश्वत निसर्ग ठेवण्यासाठीचे विचार बघा.
थोडक्यात,
मला वाटतं,मला काय सांगायच 
only when the Last Tree has Died &
The Last River has Been Poisoned.....
Will We Realise we Can't Eat Money !
 हे सर्व आपल्या लक्षात आले आसेल. 
जे काही निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, आपण ते ओरबडण्याचा आपला हक्क समजतोय, आता किती ओरबडायचं आणि पुढच्या पिढीसाठी किती जोपासायचं.
ह्या गोष्टीच आत्मपरीक्षण करुन, 
आता आपण ठरवायला पाहिजे जागतिक वसुंधरा दिवस कश्या पद्धतीने साजरा करायचा. 
निसर्ग समतोल विकास तरच राहिल आपली वसुंधरा झकास.
????????????????????????
शेखर गायकवाड,
आपलं पर्यावरण संस्था,‌नासिक.
९४२२२६७८०१/९१३०२५७८०१

संबंधित बातम्या