जालना : दारो दारी तेल विक्री करणारा मुलगा झाला RTO
जालना जिल्ह्यातील शाहगड या छोट्या गावातील तरुणानी लोकसेवा आयोगाचा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे, महेश चौथे या तरुणाने आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकरण्यासाठी मोठे परिश्रम घेत जिल्ह्यात गावचे व आई वडिलाचे नाव मोठे केले आहे. महेश चौथे ने शहागड या छोट्याशा गावात पहिले ते दहावी पर्यन्त शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेज या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी आले. तिथून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. उच्चशिक्षण घेत असतांनी वडिलांची इच्छा होती की त्याने ITI करावा. त्यामुळे लवकर काम लागते, आणि आपल्याला घरची जबाबदारी त्यांनी घावी, त्यांनी इंजिनियरिंग केले त्या नंतर त्यांचे मन त्या मध्ये देखील रमले नाही, त्यांनी मंत्रालयात मध्ये चांगली नोकरी लागली. मात्र त्यामध्ये देखील त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली, आणि ते आता परिवहन सहायक पदावर्ती त्यांची निवड झाली.
माझ्या मुलाने माझे व जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. त्याचा मला अभिमान आहे. शाळेत पुस्तक घेण्यासाठी माझा कडे पैसे नव्हते अशा बिकट परिस्थिती त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मी आठवडी बाजार करीत असे गावी गावी जाऊन बाजारात तेल विक्री केले. त्यामध्ये तो मला मदत करीत असे. दोन मुले दोन मुली असा माझा परिवार होता. सगळ्याचे शिक्षण पूर्ण करण्याची क्षमता माझा मध्ये नव्हती तरी माझ्या बहिणीने माझ्या आईने त्याला वही पुस्तके घेऊन दिली आहेत. त्यामुळे त्याचा शिक्षणामध्ये त्यांचा देखील मोठा हातभार आहे, असे मत चंद्रकांत चौथे असिस्टंट आरटीओ महेश चौथे यांच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.
माझ्या मुलाने शिक्षणासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे. त्याचा आज आम्हला अभिमान आहे. त्याने मोठे यश मिळवले आहे. आज गावातील सगळे गावकरी त्याचे स्वागत करीत आहे. त्याला शुभेच्छा देत आहे, हे पाहून आम्हाल खूप गौरव वाटतो. पुस्तक त्याला कधी वेळेवर मिळाले नाही, त्याची आजी आणि आत्या त्याला पुस्तक आणून देत असे. आमचा कामत तो मदत करीत असे आठवडे बाजारात जाऊन त्याने वाडीला सोबत तेल विक्री केली. पाकिटे तयार करणे बाजार घेऊन जाणे, असे काम देखील त्याने केले. आज आम्हला खूप बरे वाटते की, आमचा मुलगा एक ऑफिसर झाला आहे.
माझा भावाने आमच्या वडिलांचे नाव मोठे केले. एक बहिण म्हणून मला गर्व वाटतो की, माझा भाऊ अधिकारी झाला. गेले अनेक वर्षापासून तो या चांगल्या संधीची वाट पाहत होता. ती संधी त्याला आज मिळाली आहे. रात्रानं दिवस तो मेहनत घेत होता. आई वडिलाचे त्याला आमचा सगळ्यांचा खूप मोठा सपोट होता तुला तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल, ते कर आम्ही तुझा सोबत आहोत आणि आज त्याने सिद्ध केले. आज तो अधिकारी झाला याचा गावासह आम्हाला अभिमान आहे.