भारताची युद्धातील दहशत : राजाराम जाधव, ठाणे

भारताची युद्धातील दहशत : राजाराम जाधव, ठाणे
  • Positive News
  • मे 15 2025

Share on  

भारताची युद्धातील दहशत : राजाराम जाधव, ठाणे

बलुचिस्तानच्या एका व्हिडिओ ची लिंक मी  माझ्या  status वरती टाकलेली होती ती आपण पाहिलीच असेल, ती विस्तृत आहे तरी पण आवर्जून पहावी. आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात पहावे व शेअर करावे .
 त्यामुळे बलुचिस्तान मधील जनतेला जगातून हवा असलेला मानसिक आणि भावनिक पाठिंबा मिळू शकेल. बलुचिस्तानचे स्वातंत्र्य हे हा जेमतेम काही कालावधीचा प्रश्न आहे. त्यात खारीची मदत तुमची ही असुद्यात. 
एकूण पाकिस्तानच्या क्षेत्रफळापैकीच्या 67 टक्के क्षेत्रफळ एकट्या बलुचीस्थानचे आहे. तरीही तिथली लोकसंख्या सुमारे 6.80% एवढीच आहे . परंतु  पाकिस्तानच्या एकूण बजेटच्या  2% च खर्च पाकिस्तान सरकार कडून बलुचिस्तान वरती खर्च केला जातो त्यामुळे त्यांच्यामध्ये आक्रोश आहे. मग बघा की त्यांचा किती छळ होत आहे.
हा जो बलुचिस्तानचा स्वातंत्र्यलढा आहे तो फक्त स्त्रिया चालवतात, यामध्ये पुरुषांचा विशेष सहभाग  नाही, म्हणजे जनमानसात पाकिस्तान बद्दल किती आक्रोश आहे याचा आपण विचार करावा. या बलुचिस्तान मधील लोकसंख्येपैकी 2 लाख हे पूर्वीचे भारतातील मराठा, ब्राह्मण व इतर समाजाचे लोक आहेत. आणि ते खूप सुधारलेले/पुरोगामी ही आहेत. तसेच तो सर्वात श्रीमंत  आणि प्रतिष्ठित वर्ग ही आहे. हे ऐकून आपणास नवल  वाटेल की नाही? 
 कारण  काश्मीर खोऱ्यातून आपले लोक हद्दपार झालेले असताना बलुचिस्तान मध्ये आपल्या भारतीय संस्कृती बद्दल आकर्षण ठेवून असणारा समाज कसा? 
  पाकिस्तान सरकार या लोकांसाठी काही खर्च करत नाही तरीपण त्यांच्या खनिज संपत्तीची लूटमार करीत आहे. या लूटमारी मध्ये पाकिस्तान आणि चीन हे दोघेही समाविष्ट आहेत . कारण पाकिस्तानची संपूर्ण इकॉनोमी बलुस्तीस्थांच्या खनिज संपत्तीवर चालते. आणि चीनने अरबी समुद्रातील ग्वादार बंदर हे सीपॅक या महत्त्वाकांक्षी दळणवळण मार्गासाठी  साठी पाकिस्तानकडून ताब्यात घेतल्यामुळे त्या देशाकडूनही मोठ्या प्रमाणात खनिज संपत्तीची लूटमार होत आहे, याहूनही स्त्रियांचा अतोनात छळ केला जातो. बलुचिस्तान हा संपूर्ण  वाळवंटी प्रदेश  असल्यामुळे त्यांना जगण्याचे विशेषतः इतर साधन नाही. शेतीही फार थोड्या प्रमाणात होते जी पानीपत मधून आलेल्या मराठ्यांनी विकसित केलेली आहे.
तर इतिहास असा आहेकि पानिपत च्या तिसऱ्या युद्धात 1761 मध्ये अफगान रुलर मोहम्मद अबदाली  हरलेल्या 20000 मराठा सैनिकांना घेऊन अफगाणिस्तान मध्ये गेला . सदरची लढाई ही 14 जानेवारी 1761साली पानिपत , हरियाणा इथे झाली. युद्धाच्या दिवशी  साधारणपणे सायंकाळी चार वाजेपर्यंत युद्धामध्ये मराठे अग्रेसर होते आणि अफगाणी पठाण हे पळ काढण्याच्या तयारीत होते. युद्धाच्या ठरलेल्या नियोजनानुसार मल्हारराव होळकरांनी सुमारे 4 वाजता त्यांची नव्या दमाची फौज रणांगणात उतरवून सकाळपासून महादजी शिंदे यांच्या लढत असलेल्या सेनेला आराम देणे अभिप्रेत होते, परंतु त्यांनी ती फौज पाठवलीच नाही कारण त्या दोघात पेशवाई मध्ये अंतर्गत वर्चस्वाची लढाई होती . आणि मराठ्यातील या बेबंध शाही चे चित्र दुरून टेकडीवर उभ्या असलेल्या  अब्दालीने  दुर्बिणीतून पाहिले.  त्याने नव्या दमाची 10 हजार पठाणांची 
फौज रणांगणात उतरवली, त्यामुळे काही दिवसापासून  अपुऱ्या अन्न पाण्यावाचून उपाशी आणि थंडीतील कपड्यावाचून  लढत असलेल्या सुमारे 1 लाख सैन्याची कापाकापी केली. यामध्ये भावी पेशवा विश्वासराव (बाजीरावांचा मुलगा )आणि त्यांचे चुलत भाऊ सदाशिव भाऊ( चिमाजी पंत यांचा मुलगा )यांचे मुंडके छाटून अफगाणिस्तान मध्ये नेले. या प्रसंगास अनुसरून एक म्हण आहे की पानिपतमध्ये विश्वास गेला म्हणजेच मराठ्यांना लागलेला दगाबाजीचा शाप ) त्याने  इतर सैनिकांना बंदी करून तो अफगान कडे निघाला. हे युद्ध मराठी कधीच हरले नसते परंतु स्थानिक जाट, सरदार आणि  राजपूत यांनी या सैन्याला  कुठलीही मदत केली नाही. अब्दालीच्या भीतीमुळे ते युद्धापासून दूर राहिले. खरे तर ही लढाई मराठ्यांची कधीच नव्हती पण देशाप्रती असलेले कर्तव्य म्हणून मराठी आपले लोक  तिथल्या आया बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी हरियाणा मधील पानिपत पर्यंत धावले. पण त्यांचा हा त्याग व्यर्थ गेला. एक लाख मराठी बांगडी फुटली पण या युद्धामध्ये अब्दाली आर्थिक दृष्ट्या खूप कंगाल झाला. त्यामुळे युद्धाचा काही थोडा तरी खर्च बाहेर पडू दे म्हणून वीस हजार सैनिकांना  बंधक बनवून विकण्यासाठी घेऊन गेला. अन्न पाण्यावाचून हे सैनिक अटकच्या पुढे जाऊ शकत नाही कळल्यानंतर त्याने त्याचा मित्र असलेल्या बलुचिस्तान मधील सरदाराला काही किमतीमध्ये गुलाम म्हणून त्यांना विकले. आणि कालांतराने हे सर्व मराठी नाविलाजास्तव मुस्लिम धर्म स्वीकारून जगू लागले. परंतु हे शेती उद्योगांमध्ये खूप कुशल होते त्यामुळे त्यांनी तिथे न होणारी शेती सुरू केली, शेतीवर आधारित उद्योगधंदे सुरू केले, आणि या वीस हजारांमध्ये सुमारे 20 गट निर्माण होऊन त्यांनी आपापल्या गटाला  स्वतंत्र नावे दिली.... पेशवाई पेशवानी,  बुगती मराठा इत्यादी. 
त्यांनी जरी मुसलमान धर्म स्वीकारला असला तरी आजही ते तुळशीची पूजा करतात , त्यांच्या लग्नकार्यात मंगलाष्टक म्हटले जाते, आणि आईला ते आईच असे संबोधतात.  अशा कित्येक समाज पद्धती त्यांनी अद्याप जिवंत ठेवल्या आहेत. ज्यावेळी हिंदी आणि मराठी चित्रपट लागतो आणि शिवाजी आणि संभाजीची यामध्ये भूमिका असते, अशा चित्रपटांना अभूतपूर्व अशी गर्दी लोटते. नाना पाटेकरांच्या एका चित्रपटातील मराठा मारता  है मरता नही  असा जो काही संवाद आहे या संवादावर संपूर्ण थिएटर शिट्ट्यांनी गुंजून  उठते,  इतके त्यांचे  अद्यापही आपल्या मातृभूमीवर प्रेम आहे म्हणून बलुचिस्तानची लढाई ही आपली ही आहे. आपण त्यांच्यासाठी काहीही करू शकत नसलो तरी कमीत कमी हा व्हिडिओ पाहून त्यांच्या लढ्याला प्रसिद्धी प्राप्त होईल एवढे तरी खारीचे योगदान आपण दिले पाहिजे. 
कारण अमेरिका आणि युरोपीय देश हे कोणी यांच्या मदतीला येणार नाहीत, सर्वांना स्वतःचे स्वार्थासाठी विविध वेळी विविध पद्धतीने झुंजवत ठेवते ,
जी काही आपण भावनिक साद त्यांच्याशी घालायची आहे ती भारतीय आणि किंबहुना आपण मराठ्यांनी घालायची आहे.
पुलवामा येथील  दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पश्चिमी सीमेवरील पाकिस्तानच्या आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय भूमिवरील दहशतवादी अड्ड्यावर नऊ तारखेला हमला करून शंभर पेक्षा जास्त अतिरेकी आणि त्यांचे म्होरके नष्ट केले,  त्यानंतर पाकिस्तानच्या  F16  या अमेरिकेतील जगप्रसिद्ध फायटर प्लेन ला भारताने पाडले, तसेच चीनने पाकिस्तानला दिलेल्या मिसाईल आणि JF17 आणि  JF 27  ही आधुनिक विमाने देखील आपल्या मिसाईल यंत्रणेने निकामी केली. पाकिस्तान चा आण्विक युद्ध साठा उघडा पडला त्यामुळे अमेरिका तसेच चीनची मोठी पंचायत झाली कारण हे युद्ध चालू राहिले असते आणि मोठ्या प्रमाणात त्यांची  शस्त्रे निरुपयोगी ठरली असती तर त्यांची युद्ध सामग्रीची इंडस्ट्री संपुष्टात आली असती म्हणून अमेरिकेने श्री मोदींवर आणि चीन ने पाकिस्तान वर युद्धबंदी करण्यासाठी प्रचंड दबाव आणला. यामध्ये अनेक कारणे आहेत की हे युद्ध थांबावे म्हणून पण चालूच राहिले असते तर आपली निर्णायक सरशी झाली असती .
 चीन या  देशाने सुमारे 113 देशांना आर्थिक कर्जात अडकवून टाकले आहे आणि आठ ते बारा टक्के इतक्या  चढ्या दराने कर्ज देऊन तिथे विकास करण्याचा आव आणते . आर्थिक मदतीचे आमिष दाखवून आपली सत्ता जगभर पसरवत आहे.  त्या पैशावर त्या त्या देशांमध्ये विकास करण्यासाठी कंत्राटदार हे ही सगळे चिनी आणि कामगार हे देखील चिनी परंतु भीतीपोटी हे गरीब देश विरोध करत नाहीत. जेव्हा हे देश कर्ज फेडण्यास असमर्थ होतात त्यावेळी ती जागा हडप करणे हे एकच चीनचे धोरण आहे त्यामुळे अमेरिका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, कजाविस्तान, मंगोलिया, तिबेट, नेपाळ, भूतान, जपान , व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, फिलिपिन्स, म्यानमार, इंडोनेशिया, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकन देश यांनी सुटकेचा निस्वास घेतला आहे. कारण  चीन जी जगाला त्यांच्या 6th जनरेशन अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची भीती दाखवत होते तीच भारताने निकामी केल्यामुळे सर्व जग मनातून आनंदी आहे. त्या सर्वांना  भारताप्रती उत्सुकता निर्माण झाली आहे. यापुढे जागतिक सत्तेचे केंद्र हे भारतच राहणार आहे, त्यामुळे भारता बद्दलची जगभरात प्रतिमा उंचावत आहे . 
हे तीन दिवसाचे युद्ध चालू असताना भारताने त्यांची संपूर्ण  पूर्व सीमा गुंतवून ठेवल्यामुळे पाकिस्तानचे सर्व सैन्य तिथे  एकवटले, तसेच  बलुचिस्तान मधील तैनात केलेले सैनिकही  बोलावले. आणि या अल्पकाळात तेथील बलुची
लोकांनी संपूर्ण बलुची  प्रदेशाचा ताबा घेऊन स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केली व स्वतंत्र देश म्हणून बलुचिस्तानला मान्यता देण्यासाठी युनायटेड  जनरल असेम्ब्ली कडे (UNO) अर्ज दाखल केला. ही या युद्धातील आणखी एक  फार मोठी कमाई आहे.  यानंतर अफगाणिस्तान मधील तालिबान सत्ते बरोबर आपले संबंध चांगले  असल्यामुळे पाकिस्तानचा गिलगिट पख्तुंका हा अफगाणी पठाणी जनतेचा प्रदेश  अफगाणिस्तान  मध्ये सामील होईल व पाकिस्तानची छकले छकले होतील,  सिंध प्रांतातील सिंधी लोक देखील स्वतंत्र सिंधू देश जाहीर होण्यासाठी वारंवार आंदोलने करीत आहेतच.  या आंदोलनात गुजरात आणि राजस्थान मधील मारवाडी सिंधी लोक त्यांना निश्चितच आर्थिक मदत करतील आणि हे आपल्या सैन्याला भविष्यात निश्चितच मदतगार ही होणार आहे.
भारताने तर यावेळी चीनची गुरमी पूर्णच उतरून टाकली आहे, हा खेळ आणखी  जेमतेम पाच वर्षांचा आहे. तरी आपण सर्वांनी बलुचिस्तानच्या या प्रयत्नाला खारीची मदत करूया. यानंतर हे वर स्वतंत्र झालेले प्रांत भारताला POK प्राप्त करून घेण्यास निश्चितच मदत करतील आणि पाकिस्तानची इतकी छकले  झाल्यानंतर पश्चिमी सीमेवर आपणास कोणताही विरोध असणार नाही, त्यामुळे युद्धावर आपला जो खर्च होतो तो इकॉनोमी वर होईल तसेच या युद्धामुळे भारतीय  शस्त्रांबाबत  जगभर उत्सुकता निर्माण झालेली असून यामुळे भविष्यात  आपण मेक इन इंडिया द्वारे जगभरात विक्रीमध्ये खूप मोठी आघाडी घेऊ आणि सोबत आर्थिक सुबत्ता मिळऊ .
आपला देश  सन 2047 पर्यंत  प्रगतशील होईल असे  जे समजले जाते ते माझ्या मते सन 2040 मध्येच साध्य होण्यास हरकत नाही. यासाठी आपण सर्व सुमारे एक कोटी 47 लाख जनतेने तन-मन-धन  देशाची सेवा केली पाहिजे, स्वतःची प्रगती केली पाहिजे व प्रगत शेती, उद्योग आणि व्यवसायामध्ये जगभर डंका वाजवला पाहिजे व हीच योग्य वेळ आहे, जर ही आपण संधी घालवली तर आपणास ही संधी  परत कधीही प्राप्त होणार नाही. 
 संभाजी राजे यांचे जे स्वप्न होते युरोपला लागून भूमध्य  सागरापर्यंत पश्चिमेला आणि दक्षिण पूर्वेकडे जावा, सुमित्रा आणि उत्तरेस तिबेट व मध्य आशियाई राज्ये आणि दक्षिणेला मॉरिशस पर्यंत आपले भारतवर्ष निर्माण करण्याचे  जे स्वप्न होते ते आपण  विसरता कामा नये. भारत हा एक बलवान देश म्हणून परत उभा राहिला पाहिजे. ब्रिटिशांची सत्ता येण्याअगोदर जगाचा 27% व्यापार हा एका भारतातून होत होता तो आता जेमतेम 5% वरती गोऱ्या लोकांनी आणून आपली लूट मार केली तरीसुद्धा आपण आज जगभरात ताठ मानेने आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत हे केवळ तुम्हा आम्हा लोकांच्या कष्टामुळेच .आणि आपणास उच्च ज्ञान प्राप्त करून घेण्याची जी आसक्ती आहे त्यामुळे जगातील लेबर मार्केटमध्ये भारतीयांचा धबधबा आहे. जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये तिथले सीईओ हे भारतीयच आहेत, आपली मेडिकल व्यवसायातील प्रामाणिकता ही जगाने वारंवार नावाजलेली आहेच. आपण आता देशावर अवलंबून न राहता आपण देशाला काय देऊ शकतो या दृष्टीने विचार करून आपण आपली प्रगती करावी हेच राष्ट्रप्रेम आहे, अन्य काहीही असू शकत नाही .
जय शिवराय 
जय शंभुराजे
जय राणी ताराबाई ताराबाई या कोण होत्या हे आपणा कोणालाही माहीत नाही पण त्यांचे कार्य छत्रपती शिवाजी आणि शंभूराजे यांच्यापेक्षा कित्येक पटीने अवघड असूनही मराठी सत्ता त्यांनी सात वर्षे लढवली आणि या औरंगजेबाला दिल्लीला परत न जाऊ देता या मातीतच गाढले, त्यामुळे त्या मातेला आपण त्रिवार नमन केले पाहिजे.
जय महाराष्ट्र
जय भारत

राजाराम जाधव, ठाणे

संबंधित बातम्या