विजयादशमी : अहंकाराचा पराभव, सद्गुणांचा विजय 

 विजयादशमी : अहंकाराचा पराभव, सद्गुणांचा विजय 
  • Positive News
  • ऑक्टोबर 2 2025

Share on  

 विजयादशमी : अहंकाराचा पराभव, सद्गुणांचा विजय 

विजयादशमी हा सण म्हणजे सद्गुणांचा असत्यावर विजय आणि धर्माचा अधर्मावर जयघोष याचे प्रतीक आहे. प्रभु श्रीरामांनी रावणावर केलेल्या विजयाची ही ऐतिहासिक आठवण आजही आपल्याला प्रेरणा देते.

रामचरित्रातून आपण शिकतो की जीवनात कितीही संकटे आली तरी सत्य, संयम आणि धैर्य यांच्या बळावर यश मिळवता येते. रावणरूपी दंभ, अहंकार, लोभ व क्रोध या दोषांचा नाश करूनच खऱ्या अर्थाने “दशहरा” साजरा होतो.

आजच्या काळात आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील रावणरूपी नकारात्मकतेवर विजय मिळवून, सीमोलंघन करत नवी प्रगती साधावी. हाच या सणाचा खरा संदेश आहे.

 विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
 प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन, सद्गुणांच्या मार्गाने पुढे जाऊया! 

संबंधित बातम्या