जिद्दीची कहाणी : प्रणिता वामन – बेल पेपर शेतीतील क्रांती
शेती हा व्यवसाय केवळ परंपरेनेच नाही तर आधुनिक दृष्टीकोन आणि शिक्षणाच्या जोडीने केला तर मोठे यश मिळविता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे जून्नर (पुणे) येथील प्रणिता वामन.
MBA केलेल्या प्रणितांनी पारंपरिक करिअर सोडून २०२० मध्ये एक एकर प्लायहाऊसमध्ये बेल पेपर (कॅप्सिकम) शेती सुरू केली. पहिल्याच वर्षी त्यांनी १० लाख रुपयांचा नफा कमावला आणि पुढे मागे वळून पाहिलेच नाही.
त्यांच्या मेहनतीचे गणित :
प्रति एकर टर्नओव्हर साधारण ₹३० लाख
खर्च ₹८ ते ₹१० लाख
शुद्ध नफा ₹२१ लाख प्रति एकर
आज प्रणिता यांनी ही शेती २५ एकरांवर विस्तारली असून वार्षिक टर्नओव्हर ₹४ कोटी व नफा सुमारे ₹२.२५ कोटी इतका आहे.
त्यांच्या या मिरच्या मुंबई, पुणे, नाशिक, जयपुर अशा बऱ्याच ठिकाणी विकल्या जातात
त्यांच्या शेतीची खासियत म्हणजे लाल, पिवळे आणि हिरवे बेल पेपर हे उच्च गुणवत्तेचे उत्पादन. त्यांनी केवळ कुटुंबालाच नव्हे तर गावातील शेतकऱ्यांना आणि महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
प्रणितांची ही कहाणी दाखवते की जर एक स्त्री ही करू शकते तर बेरोजगारी साठी, किंवा कमी उत्पन्नासाठी दोष न देता आपले शेतकरी बंधू शेतीतूनही करोडोंचा टर्नओव्हर करू शकतात ना?
ही प्रेरणा प्रत्येक तरुण शेतकऱ्यासाठी, विशेषतः तरुणींसाठी, मार्गदर्शक आहे.
“यश मिळवण्यासाठी शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि न थांबणारी जिद्द यांचा संगम आवश्यक आहे.” – प्रणिता वामन