"पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..."
धर्माचं आचरण, उपासना आणि शुद्ध जीवन यामुळेच या जन्मी ईश्वराविषयी ओढ निर्माण होते.
आळंदीचे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं जेव्हा प्रथम पंढरपूरला गेली, त्या वेळी विठोबाचं दर्शन घेतल्यावर ज्ञानदेव म्हणाले –
"रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी.."
यावर मुक्तानं विचारलं –
"दादा, तुम्हाला सुख वाटतं, मग इतरांना का वाटत नाही?"
ज्ञानदेव उत्तरले –
"मुक्ते, बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी..."
ज्ञानेश्वर म्हणतात –
"सर्व सुखाचे आगर हा विठोबा आहे... तो केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..."
त्यांना तो अनुभव आला तेव्हा त्यांनी गायलं –
"अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे..."
तुकाराम महाराज – "आनंदाचे डोही आनंद तरंग..."
नामदेव महाराज – "सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली..."
संत अमृतराय – "अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी..."
संत सेना महाराज – "जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची..."
सर्व संतांना विठोबाच्या दर्शनातून अखंड आनंद मिळतो.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात –
"संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे..."
संतांचा संग, त्यांचे ग्रंथ, त्यांचे विचार मन निर्मळ करतात.
मन शुद्ध झाले की ईश्वराची आवड आपोआप उत्पन्न होते.
तुकाराम महाराज म्हणून गेले –
"काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती..."
संतांची स्थिती अशी की –
"ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा..."
म्हणूनच शेवटी वाटतं –
"संत संग देई सदा..."
कधी कधी असा एखादा छोटासा लेख वाचला, तरी अंगावर रोमांच उभे राहतात.
धन्य ती आपली संतपरंपरा, त्यांचे जीवन-आदर्श आणि जन्मोजन्मीची साधना!