नाशिक, ३१ ऑक्टोबर:
मनमाड–मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या जीवनवाहिनी असलेल्या पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसने यंदा आपला गौरवशाली सुवर्णमहोत्सवी टप्पा (५० वर्षे) पूर्ण केला आहे. सेवा, वेग आणि विश्वासाचे प्रतीक बनलेली ही रेल्वे आजही नाशिककरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
१ जून १९७५ रोजी मध्य रेल्वेने ही गाडी प्रथमच सुरू केली. सुरुवातीला ही गाडी मनमाड–मुंबई दरम्यान धावू लागली. त्या काळात पंचवटी एक्सप्रेसने मुंबई–नाशिक प्रवासासाठी नवीन वेग आणि वेळेची शिस्त निर्माण केली. ही गाडी नाशिकरोड, देवळाली, लासलगाव, मनमाड अशा महत्त्वाच्या स्थानकांना जोडते.
गेल्या ५० वर्षांत लाखो प्रवाशांचा विश्वास संपादन करत पंचवटी एक्सप्रेस आजही दररोज वेळेवर धावत राहते. तिच्या वेगवान व सुरक्षित प्रवासामुळेच नाशिककरांनी तिला “जीवनवाहिनी” हा मानाचा किताब दिला आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त,
पंचवटी मध्ये रेल्वे प्रवासी संघ (रजि.) यांच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुभेच्छुक:
संघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब पोपटराव केदारे,
पदाधिकारी — दीपक भदाणे, आनंद मुकणे, अरुण गिरजे, मनोहर पगारे, गोपीनाथ कासार, पोपट नागरे, सुनीता गरुड व सर्व पासधारक.
संघाच्या आवाहनानुसार, सर्व नाशिककरांना या आनंदोत्सवात सहभागी होऊन पंचवटी एक्सप्रेसला थांबून शुभेच्छा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.