सकाळी घरातील सगळ्यांपेक्षा आधी
तीच जागी होत असते…
आणि रात्री सगळ्यांची कामं संपल्यावर
सर्वात शेवटी
तीच डोळे मिटत असते…
दिवसभर तिचे हात थांबत नाहीत…
कधी स्वयंपाकघरात…
कधी मुलांमध्ये…
कधी घराच्या काळजीत…
तर कधी सगळ्यांच्या भावनांना सांभाळण्यात…
एवढाच वेळ
तिने घराबाहेर कुठे दिला असता…
तर कदाचित
तिला पगार मिळाला असता…
सुट्ट्या मिळाल्या असत्या…
आणि “काम करते”
म्हणून ओळखही मिळाली असती…
पण घरात केलेल्या कामाला
पगार नसतो…
साधं “थँक यू” सुद्धा नसतं…
आणि तरीही…
सहजच काही जण बोलून जातात —
“ती काय करते?
घरातच तर असते…”
पण खरं तर…
ती “घरात असते” म्हणूनच
संपूर्ण घर
शांत, व्यवस्थित
आणि प्रेमाने भरलेलं असतं…
तिलाही खूप काही बोलायचं असतं…
मन मोकळं करायचं असतं…
पण अर्ध आयुष्य
इतरांचंच ऐकण्यातच निघून जातं…
तिलाही कधी थकवा येतो…
स्वतःसाठी जगायचं असतं…
एखादं स्वप्न पूर्ण करायचं असतं…
पण नकळत
तिची स्वप्नं
घराच्या भिंतींमध्येच गुंडाळली जातात…
आणि तरीही…
ती रोज पुन्हा उभी राहते…
हसत राहते…
कारण तिच्या हसण्यातच
संपूर्ण घराचं सुख दडलं असतं…
खरंच…
गृहिणी होणं
इतकंसं सोप्प नसत ना ?....