"प्रेम "
या जगामध्ये "प्रेम" हे एक झाडासारखे आहे.... त्या झाडाला आपण जपलं तर व त्या झाडावर आपण प्रेम केल तर ते झाड आपल्याला दुप्पट "प्रेम" देईल म्हणजेच तो झाड आपल्याला फळं, सावली, वायू व इत्तर कारणा पासून आपल्याला बचाव करेल व या जगात जगण्यास मदत करेल... हे सर्वांचं कारणीभूत म्हणजे प्रेम....
"प्रेम" दोन शब्दांचे असले तरी या प्रेमाच्या घरामध्ये एका प्रेमाने पूर्ण जग सामावून घेतलेले आहे....लोक असे म्हणतात की प्रेमाने पूर्ण जग जिंकता येतो ..... हे खरं आहे का ? हो हे खरं आहे पण...या काळात प्रेमाचं अस्तित्व राहिलेला नाही... प्रेमा माघे प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ बघत असतो... आणि हे खरं आहे... आणि प्रेम हे आज कालच्या उवा पिढीमध्ये खूप प्रमाणात दिसून येतो ; यालाच प्रेम असे समजले जातात पण हे चुकीचे विचार आहेत... काही लोकांना प्रेम म्हणजे माहिती नसत तर काही लोकांना प्रेम हे माहिती असून हे प्रेम या शब्दांचा चुकीचा वापर करतात व आपले त्यात स्वार्थ शोधत असतात.... बरोबर ना.., आता तुम्ही हे विचार करू नका की मी हा का विषय निवडला....तुम्ही हे हि विचार कराल की मी कोणावरतरी प्रेम करत असेल म्हणून हा विषय निवडला असेल... तर हे असा काही नाही मला फक्त तुमच्या पर्यंत हे सांगायचं आहे की प्रेमाचं खर अर्थ काय आहे... चला म मी सुरवात करतो पुढे नक्की वाचा...
प्रेम म्हणजे काय ? प्रेम आपल्याला होत का? आपण आपला प्रेम कशामध्ये शोधतो ... प्राणी-पक्षी वर का निसर्गावर का एका मुलीवर... मुलगी असेल तर एका मुलावर प्रेम शोधतात का ?.. पण आताच्या परिथितीवर तेच चालू आहे. पण काही जण आपल्या आई-वडील वर आपल प्रेम शोधतात... सॉरी माफ करा... आई-वडिलांचं प्रेम हे शोधावं नाही लागत ते नेहमीच आपल्या वर असत.... २१ व्या शतका मध्ये प्रेमाच लोकांनी फक्त खेळ करून ठेवलाय प्रेमाच्या नावाखाली आपला स्वार्थ शोधतात... पण प्रत्येक जण आपल स्वतःच स्वार्थ नाही बघत ते आपल्या खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात ते पण सांगायला गेलं तर प्रेम शोधावं नाही लागतं हे प्रेम निसर्गाची एक देन आहे ते अपल्या नकळत होत....
प्रेम हे एक मौल्यवान घटक आहे . प्रेम हे पवित्र आहे असं का म्हणतात याचा विचार केला आहे का कधी.... प्रेम हे एक सत्य आहे... प्रेम हा असा एक प्रकाश आहे जो मानवी जीवना मधला अंधकार , राग , द्धेष दूर करतो;, प्रेमाचं स्वतःच एक अस्तित्व आहे..आताच्या काळात खरं प्रेम बघायला गेलं तर ते म्हणजे डोळे बंद करून ९ महिने पोटात ठेऊन प्रेम करते ती म्हणजे आई.... ते खरं प्रेम... अस प्रेम कुठूनही शोधून भेटणार नाही .. आजकालच्या मुलांमध्ये तर बघता क्षणी प्रेम होतं असे बोलतो पण खरं बघायला गेल तर ते फक्त आपलं आकर्षण असतो त्याला प्रेम समजून आपले जीवन घडवतात म नंतर कळत की हे प्रेम नाही नंतर दुसऱ्या व्यक्तीला दोष देत बसतात.... कधीच असे कोणाला बोलू नका की मी तुझ्यावर प्रेम करतो किंव्हा करते ;
प्रेम जरी आपण कोणावर करत असलो त्या मागे आपल स्वार्थ बघु नका ते आपले आई-वडील असो किव्हा कोणी दुसरे.... प्राणी पक्षी हे त्यांचं प्रेम खूप इमानदारी ने निभावत असतात ते आपल्याला कधी सोडून जात नाही का कारण प्राण्याचं त्या मध्ये कधी स्वार्थ नसतो त्यांना फक्त आणि फक्त प्रेम पाहिजेल असत ... तसेच मित्र परिवारामध्ये ही खूप प्रमाणात प्रेम दिसून येतो का कारण त्या मध्ये त्यांचं कधी स्वार्थ नसत.... काही काहीचं स्वार्थ असतोच म्हणून त्यांची मित्रता तुटून जाते.... तसेच निसर्गावर प्रेम करा त्यांच्या मुळे तर आपण आहोत बरोबर ना ? गर्वाने माणूस कधी पुढे जात नाही मात्र प्रेमाने तर पूर्ण जग जिंकता येतो ... प्रेम बोल्यावर प्रेम काय मनुष्य किव्हा इत्तर निर्जीव गोष्टीवर नाही होत कोणत्याही वस्तूवर ही प्रेम होऊ शकतो... पण हा प्रेम करता येत नाही ते होऊन जात ते कोणावर ही असो पण प्रेमाचं कोणीही दूर उपयोग कधी करू नका त्या मुळे प्रेम हे नावासाठी अस्तित्वात राहिला आहे .
मंगेश भगवान गायकवाड
(अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक)