आरोग्यदायी कुळीथ/हुलगा (Horse Gram)
कुळथाचं माडगं (किंवा सूप)
कुळीथ (hulga or horse gram) खाण्याचे अनेक फायदे आहेत. कुळीथमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि फायबर असते.
कुळीथ खाण्याची योग्य पद्धत:
कुळीथ डाळ (horse gram) विविध प्रकारे आहारात समाविष्ट करता येते. ती भिजवून, उकडून, किंवा त्याची भाजी, सूप, किंवा उसळ बनवून खाल्ली जाते. तसेच नीट भाजून त्याचे पीठ करून ठेवता येते आणि जेव्हा हवे तेव्हा थोडे पीठ घेऊन त्याचे सूप किंवा माडगे बनवता येते.
हे पेय पारंपरिक आयुर्वेदीय दृष्टिकोनातून अतिशय पौष्टिक आणि औषधी मानलं जातं. खासकरून थंडीच्या दिवसांत किंवा सांधेदुखी, मूत्रविकार, वायू विकार यामध्ये याचा उपयोग खूप फायदेशीर ठरतो. तसेच एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याला पोषक आहार म्हणून कुळथाचे माडगे प्यायला दिले जाते.
कुळथाच्या माडग्याचे/सूपाचे फायदे:
1)सांधेदुखी व वातविकारात आराम:
कुळथामध्ये वात शामक गुणधर्म असतो. त्यामुळे अर्धांगवायू, संधिवात, कंबरदुखी यामध्ये उपयोगी आहे.
2) मूत्रविकारांमध्ये उपयोगी:
कुळीथ हे मूत्रल (diuretic) आहे. त्यामुळे मूत्र साफ होणं, मूत्रदाह, किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) यासाठी खूप फायदेशीर. यासाठी भिजवलेले कुळीथ पाण्यात उकळवून त्याचे सूप पिणे फायदेशीर ठरते.
3) रक्तदाब नियंत्रित करते:
त्यातील पोटॅशियम आणि फायबर्स रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करतात.
4) वजन कमी करण्यात मदत:
कुळथामधील प्रथिने आणि फायबर्समुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते.
5) पचन शक्ती सुधारते:
सोपं पचणारं असून पचनतंत्र मजबूत करतं. अॅसिडिटी, गॅसेस यामध्ये आराम मिळतो.
6) आयरनचा चांगला स्रोत:
कुळथामध्ये आयरन भरपूर असल्याने अशक्तपणा, थकवा, हेमोग्लोबिन कमी असल्यास खूप फायदा होतो.
7) हृदयासाठी हितकारक:
कोलेस्ट्रॉल कमी करते:
कुळीथ शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवते.
हृदय निरोगी ठेवते.
8) मधुमेहासाठी (Diabetes):
कुळीथ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, त्यामुळे मधुमेहींसाठी ते फायदेशीर आहे.
9)वजन कमी करण्यासाठी (Weight Loss):
कुळीथमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते वजन कमी करण्यास मदत करते. तसेच, ते भूक नियंत्रित ठेवते.
कसे घ्यावे?
10) रोगप्रतिकारशक्ती वाढवते:
कुळीथमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
कफ आणि खोकला कमी करते. भिजवून शिजवलेल्या कुळीथाचा काढा कफ आणि खोकला कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
कुळथाचं माडगं कृती–
प्रकार 1:
ज्यांना गोड खायचे नाही अशा लोकांसाठी.
2 कप पाणी आणि थोडं मीठ, लसूण, घालून उकळून घ्यायचे त्यामध्ये पाण्यात विरघळवलेले 2 ते 3 चमचे कुळथाचे पीठ घालून चमच्याने हलवत राहायचे मंद गॅसवर पाच मिनिट शूजवून घेणे. हवी असल्यास थोडी कोथिंबीर घालून पिण्यास देणे.
प्रकार 2:
ज्यांना गूळ चालतो अशा लोकांसाठी.
दोन कप पाणी पातेल्यात ठेवून त्यामध्ये थोडेसे मीठ आणि दोन ते तीन चमचे गुळ घालून ते पाणी उकळवायचे. दोन ते तीन चमचे कुळथाचे पीठ एका भांड्यात पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि उकळत्या पाण्यात घालून चमच्याने हलवत पाच मिनिट शिजवायचे. गुळाचे प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात माडगं घ्यावं तर अधिक फायदेशीर ठरतं.
सूचना / Disclaimer:
वरील लेखात दिलेली माहिती पारंपरिक आयुर्वेदिक आणि आहारशास्त्रीय संदर्भांवर आधारित आहे. ही माहिती केवळ सर्वसामान्य आरोग्य-जागरूकतेसाठी दिली आहे. कोणताही नवीन आहार, घरगुती उपाय किंवा औषधी पदार्थ वापरण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. तुम्हाला एखादी विशिष्ट आरोग्यसमस्या असल्यास वैद्यक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कुळीथासारख्या पदार्थांचा परिणाम व्यक्तिपरत्वे वेगळा असू शकतो.