ग्राउंडिंग (अर्थिंग) विज्ञान आणि वृक्ष-स्पर्श ध्यान , पृथ्वीशी पुन्हा नाते : (डॉ अंजली जाधव, ठाणे) 

ग्राउंडिंग (अर्थिंग) विज्ञान आणि वृक्ष-स्पर्श ध्यान , पृथ्वीशी पुन्हा नाते : (डॉ अंजली जाधव, ठाणे) 
  • Positive News
  • सप्टेंबर 30 2025

Share on  

ग्राउंडिंग (अर्थिंग) विज्ञान आणि वृक्ष-स्पर्श ध्यान , पृथ्वीशी पुन्हा नाते : (डॉ अंजली जाधव, ठाणे) 

 पृथ्वीची नैसर्गिक ऊर्जा

पृथ्वीच्या पृष्ठभागावर मुक्त इलेक्ट्रॉन्समुळे नकारात्मक विद्युत्‌ चार्ज असतो.
जेव्हा आपण मातीवर किंवा गवतावर अनवाणी चालतो, तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स आपल्या शरीरात शोषले जातात.

हे इलेक्ट्रॉन्स नैसर्गिक ॲण्टिऑक्सिडंट्स सारखे कार्य करतात व शरीरातील जास्त फ्री रॅडिकल्स निष्क्रिय करतात.
 वृक्ष का अधिक प्रभावी ठरतात?

वृक्ष हे पृथ्वी आणि आकाश यांच्यातील ऊर्जा-वाहक मानले जातात.

मुळे जमिनीत खोलवर जातात → पाणी, खनिजे व पृथ्वीची ऊर्जा शोषतात.

पाने सूर्यप्रकाशाशी जोडली जातात → प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे जैवऊर्जा निर्माण होते.

जेव्हा आपण वृक्षाला स्पर्श करतो किंवा मिठी मारतो → आपण या “पृथ्वी-आकाश सर्किटला”  जोडले जातो.
परंपरेनुसार वृक्ष तुमचा ताण शोषून घेतात आणि समतोल परत देतात.

हे कसे करावे? (स्टेप बाय स्टेप):

१. योग्य जागा निवडा:

निरोगी वृक्ष निवडा.

स्वच्छ, शांत वातावरण (प्रदूषित/औद्योगिक जागा टाळा).

गवत, माती किंवा वाळूवर अनवाणी उभे राहणे उत्तम.

२. शरीराची स्थिती:

वृक्षासमोर उभे राहून दोन्ही तळहात खोडावर ठेवा.

किंवा दोन्ही हातांनी वृक्षाला मिठी मारा.

किंवा पाठीला वृक्षाचा आधार द्या आणि पाय जमिनीवर ठेवा.

३. श्वसन आणि जागरूकता:

सावकाश, खोल श्वास घ्या.

कल्पना करा की तुमच्या पायांपासून मुळे जमिनीत जात आहेत.

ताण, वेदना, नकारात्मकता पृथ्वीत जात आहे असे भासवा.

त्याचवेळी जमिनीतून व वृक्षातून नवी ऊर्जा, प्रकाश शरीरात येत आहे असे अनुभवा.

४. कालावधी:

किमान १५ मिनिटे.

अनेकांना फक्त ५–१० मिनिटांतही हलकेपणा व ताजेपणा जाणवतो.

परंपरा आणि अध्यात्मिक दृष्टिकोन:

आयुर्वेद व योग तत्त्वज्ञानात:

वृक्ष हे प्राणशक्तीचे साठे मानले जातात.

वृक्षाला मिठी मारल्याने दोष संतुलित होतात, मन शांत होते आणि निसर्गाशी एकरूपता मिळते.

चिनी परंपरागत वैद्यकशास्त्र (TCM):

वृक्षांनाही मानवांसारखे मेरिडियन्स (ऊर्जेचे मार्ग) मानले जाते.

जुने, भक्कम वृक्ष (उदा. वड, पिंपळ, ओक) हे “ची” (जीवनऊर्जा) वाढवतात असे मानले जाते.

 जुन्या परंपरांमधील ग्राऊंडींग
पूर्वी लोक प्युअर लेदरच्या चप्पला वापरत. लेदर हा नैसर्गिक ऊर्जा वाहक असल्याने जमिनीशी संपर्क साधला जात असे आणि ग्राऊंडींग सहज घडत असे.

आजच्या रबर/प्लॅस्टिकच्या चप्पला मात्र इन्सुलेटर असल्याने पृथ्वीची ऊर्जा शरीरापर्यंत पोहोचत नाही.

गावाकडे लोक वडाच्या झाडाच्या पारावर बसत, जेथे थेट माती/दगडाशी संपर्क होत असे. वड, पिंपळ, अश्वत्थ हे वृक्ष प्राणशक्तीने परिपूर्ण असल्यामुळे मन शांत, शरीर ताजेतवाने होत असे.

 वटसावित्री पौर्णिमा आणि वडाचे झाड

भारतीय परंपरेत स्त्रिया वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाखाली बसून पूजा करतात, परिक्रमा करतात.

त्या वेळी अनवाणी जमिनीवर बसणे → थेट ग्राऊंडिंग घडते.

वडाच्या मुळे पृथ्वीची ऊर्जा देतात तर पौर्णिमेचा चंद्र भावनिक स्थैर्याला पोषण देतो.

मंत्रोच्चार, प्रार्थना, दीर्घ श्वसनामुळे मन अधिक शांत व संतुलित होते.

हे खरं तर ग्राऊंडिंगचेच एक पारंपरिक रूप आहे, ज्यामध्ये पृथ्वीची, वृक्षांची आणि चंद्राची एकत्रित ऊर्जा लाभते.

शास्त्रीय अभ्यासांमध्ये दिसून आलेले फायदे:

* सूज (Inflammation) कमी होते

* झोप चांगली लागते

* ताणतणाव कमी होतो (कॉर्टिसॉल कमी)

* रक्ताभिसरण सुधारते व ऊर्जा वाढते

* वेदना व थकवा यांतून लवकर बरे वाटते

 थोडक्यात:
अनवाणी वृक्षाला स्पर्श, वडाच्या पारावर बसणे किंवा वटसावित्री पौर्णिमेसारख्या परंपरा — या सर्व आपल्या शरीराला पृथ्वीच्या नैसर्गिक ऊर्जेशी जोडतात. जुन्या परंपराच आजच्या ग्राऊंडींग सायन्सचे मूळ आहेत.
 

संबंधित बातम्या