नाशिक : मविप्र समाजाचे केटीएचएम महाविद्यालय नाशिक येथे आज दि. १७.१०.२०२५ रोजी दुर्गोत्सव साजरा करण्यात आला. युनेस्कोने शिवछत्रपतींच्या १२ दुर्गाना जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या किल्ल्यांना मानवंदना देण्यासाठी इतिहास विभाग आणि इंटेरियर डिझाईन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याचा उपक्रम घेण्यात आला. यानिमित्ताने किल्ले साल्हेर आणि प्रतापगड यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या. तसेच त्या किल्ल्यांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना आहिरे म्हणाल्या, ‘किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. यातील शिवछत्रपतींच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र हा अभिमान केवळ भावनेपुरता असता कामा नये. तो आपल्या कृतीतून दिसला पाहिजे. यासाठी आपली वारसा स्थळे आपण जतन केली पाहिजेत. याविषयी समाजात जागृती व्हावी म्हणूनच आपण महाविद्यालयातर्फे असे उपक्रम आयोजित करत असतो.’ या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. एस. आर. शिरसाठ, उपप्राचार्य डॉ. एन. डी. गायकवाड, डॉ. वसंत बोरस्ते विविध प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाला मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीनजी ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमास वरिष्ठ महाविद्यालय विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष शेलार, इंटेरियर डिझाईन विभाग प्रमुख सपना पाळेकर, इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. नारायण शिंदे, डॉ. संदीप भामरे, डॉ. विलास पवार, प्रा. संगीता चवानके प्रा. केशव कदम, प्रा. सुनील वारुंगसे तसेच इंटेरियर डिझाईन विभागाच्या डॉ.जयश्री पुराणिक, प्रा. चित्रा कुलकर्णी, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. गणेश रोडे, प्रा. सुजित हांडोरे यांनी मेहनत घेतली.