तळपायांना तेल लावा आणि या त्रासांपासून रहा दूर! 

 तळपायांना तेल लावा आणि या त्रासांपासून रहा दूर! 
  • Positive News
  • जून 30 2025

Share on  

 तळपायांना तेल लावा आणि या त्रासांपासून रहा दूर! 

आपल्या शरीरात पाय हा फार महत्वाचा भाग आहे, पण बरेचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः तळपायांची काळजी घेतली नाही, तर त्याचे दुष्परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतात. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेल लावल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक तक्रारी कमी होतात.

तळपायांना तेल लावण्याचे फायदे:
1.  झोप सुधारते
तळपायांना हलक्या हाताने तेल लावून मसाज केल्याने मन शांत होते आणि झोप अधिक गाढ लागते. विशेषतः झोपेच्या अडचणी असणाऱ्यांसाठी हा उपाय उपयुक्त आहे.

2.  संधिवात व पायदुखीपासून आराम
बऱ्याच लोकांना पायात ताण, वेदना, थकवा जाणवतो. नारळ तेल किंवा तीळ तेलाने तळपायांचा मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात.

3.  दृष्टी सुधारणे
आयुर्वेदानुसार तळपायांना तेल लावणे आणि मसाज केल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो.

4.  तनाव व थकवा दूर होतो
पायांमध्ये बरीच महत्वाची मज्जासंस्था असते. मसाजमुळे शरीरातील तणाव दूर होतो आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स होतं.

5.  मुलांमध्ये वाढ आणि मनाची शांतता
लहान मुलांना रात्री झोपण्याआधी पायाला तेल लावल्यास त्यांचा विकास चांगला होतो आणि ते शांत झोपतात.

 कसे करावे?
झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा.

हलकं गरम केलेलं तीळ तेल, खोबरेल तेल किंवा बदाम तेल वापरा.

तळपायांना ५–१० मिनिटं सौम्य मसाज करा.

त्यानंतर सॉक्स घालून झोपा.

 सूचना / Disclaimer:
वरील उपाय हे घरगुती स्वरूपाचे असून, सामान्य आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पण जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची अ‍ॅलर्जी, गंभीर शारीरिक समस्या किंवा पायांच्या त्वचेशी संबंधित आजार असतील, तर कृपया वैद्यकीय सल्ला घेऊनच हे उपाय करा.

 “नियमित तळपायांची काळजी घ्या – कारण पाय मुळेच आपण जीवनभर चालतो!” 


 

संबंधित बातम्या