आनंदी मन = निरोगी शरीर : लेखक: डॉ अंजली जाधव भावनात्मक उपचार प्रशिक्षक
आरोग्य विचार
तुम्ही औषध घेतलंत…
रक्ताची टेस्ट, स्कॅनिंग, तपासणं — सगळं नॉर्मल आहे.
पण तरीही त्रास कमी होत नाहीये?
मग मनात गोंधळ सुरू होतो....
ऍलोपॅथी करू की अजून काही करू?
होमिओपॅथी करून पहा, आयुर्वेद करून पहा,
हर्बल मेडिसिन घ्या,
ज्योतिषा कडे जा,
क्रिस्टल वापरा,
रत्ने वापरा
अंकशास्त्र पहा.....
असे एक ना अनेक उपचार केले जातात
याचा अर्थ असा असू शकतो —
त्रास शरीरात नाही, मनात आहे.
जेव्हा मन असंतुलित असतं -
ताण, चिंता, अपराधीपणा, राग, भीती…
या भावना शरीरावर हळूहळू खोल परिणाम करत जातात. आणि याचे रूपांतर अतिरिक्त स्ट्रेस हार्मोन्स सिक्रिट होण्यामध्ये होते.
त्यामुळे...
झोप बिघडते
पचन कमजोर होतं
हार्मोन्स असंतुलित होतात
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
आणि मग कोणतीही औषधं दिली तरी…
जमिनीची मशागत न करता त्यावर पाणी घातल्यासारखं काम होतं.
औषधे उपयुक्त असतात पण फक्त त्यावरच अवलंबून राहू नये
मग काय करावं?
मन शांत ठेवा
• दररोज 10 मिनिटं ध्यान, प्रार्थना किंवा शांत बसणं
• स्वतःशी प्रेमाने बोला:
“मी आनंदी आहे… मी निरोगी आहे…”
• निसर्गात वेळ घालवा – फुलांकडे पाहा, गच्चीत बसा, आकाशाकडे दूरवर पहा.
• सकारात्मक लोकांशी बोला
• मनातील ताण बोलून मोकळा करा –
डायरी लिहा, विश्वासू मित्राशी / मैत्रिणींशी बोला.
गरज लागल्यास थेरपिस्टचा सल्ला घ्या
असेही घडू शकते:
कधी कधी ग्रामीण भागात अशा केसेस मध्ये देव देवरूषी पहिले जातात . अमुक या व्यक्तीने करणी केली आहे ,हे उपाय करा .
किंवा या देवीचा कोप झाला आहे हे उपास करा , पूजा करा .
अशा वेळी रुग्णाने या गोष्टी मनापासून मान्य केल्या आणि त्याने त्याचे मन शांत झाले तरीही त्याला आराम मिळतो . म्हणजे काय तर तुमचे मन जेव्हा शांत असते तेव्हा तुम्हाला बरे वाटते.
मनाचं आरोग्य = शरीराच्या उपचारांचा पाया
जेव्हा मन शांत असते, आनंदी असते.....
तेव्हाच औषधं, आहार, झोप — सगळं काही चांगलं काम करतं अन्यथा फक्त त्रास, त्रास आणि त्रास हे चक्र सुरू च राहते!
मन शांत... शरीर तंदुरुस्त... आयुष्य सुंदर!
(By: Smiler Anjali Jadhav ... Emotional Healing Coach)
#SmileBackToLife #EmotionalHealing #MentalPeace