मुंबईतील रेल्वे अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही घटना…

मुंबईतील रेल्वे अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही घटना…
  • Positive News
  • जून 9 2025

Share on  

मुंबईतील रेल्वे अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही घटना…”

मुंबई : आज सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून CSMT कडे जाणाऱ्या लोकलमधून ८ प्रवासी पडून मृत्युमुखी पडले. काही जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दुःख व्यक्त केले आहे. घटनेची चौकशी सुरू आहे. गर्दी आणि सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईकरांसाठी आजची सकाळ एक हृदयद्रावक बातमी समोर आली. कसाऱ्याहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लोकलच्या दरवाज्याला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले, त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत एक २३ वर्षीय तरुणीही गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान घडलेल्या या रेल्वे अपघातात ऐरोलीतून कामासाठी निघालेली 23 वर्षीय स्नेहा गौतम दौडे (रा. टिटोळा) ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी ८ वाजताच्या सुमारास ती घरातून कामावर निघाली होती. मात्र तिचा अपघात झाल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. तिचे नातेवाईक सध्या रुग्णालयात तिची प्रकृती जाणून घेण्यासाठी धाव घेत आहेत. या रुग्णालयात एकूण 9 जणांवर उपचार सुरू असून, एकाचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि प्रशासन अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात बोलावले आहे. प्रत्यक्षदर्शींनी अपघात कसा घडला आणि त्यांना कशी दुखापत झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या