वर्धा : रंगांविना साजरी केली जाते होळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना घेऊन अभिनयाचे आयोजन
- होळी म्हटलं की रंगांची उधळण आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे रंगाची उधळण होत नसेल परंतु या सगळ्या परंपरेला फाटा देत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारानुसार वर्धा जिल्ह्यात विणा रंगाची होळी रॅलीच्या माध्यमातून निघत असते. यामध्ये नागरिकांना रंगाचे होणारे दुष्परिणाम आणि पाणी वाचवण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात येत असतो. या अभिनव उपक्रमाला जवळजवळ आज 31 वर्ष पूर्ण होत आहे. या रॅलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक मान्यवर रॅलीच्या दरम्यान संदेश देत असतात. मद्यपान न करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे, केमिकल रंगाचा वापर न करणे याबाबत सुद्धा यावेळी जनजागृती करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भजनी मंडळ या अभिनव धुलिवंदनामध्ये सहभागी झाले होते.