राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आजचा दिवस उत्तम असून नवीन कामे, आर्थिक नियोजन आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे."
चंद्र नक्षत्र - श्रवण / संध्याकाळी ५.४३ नंतर धनिष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.
चंद्र त्रिकोण मंगळ.
चंद्र लाभ शनी.
३० जूलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर गुरु, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आशावादी, उदार व नशीबवान असतात. धार्मिक स्थळांना भेट देणे तुम्हाला आवडते. काही चांगले गुण सुप्त स्थितीत असून बोलण्यात मोकळेपणा असतो. तुमच्यात उत्साह असूनही तुम्ही सतत अस्वस्थ असतात. कल्पनाशक्ती उत्तम असल्याने उत्तम दर्जाचे कलाकार, संगीतकार, लेखक होऊ शकतात. स्मरणशक्ती उत्तम असून नातेवाईक प्रिय असतात. तुम्ही कष्टाळू व उद्योगी असतात. बहुत करून आयुष्यात यश मिळते परंतु घरात कटकटी चालू असतात. अडचणींवर मात करण्याची शक्ती असते. आपल्या स्वतःच्या घराबद्दल व देशाबद्दल तुम्हाला प्रेम असते. प्रवास करणे, इतर देशांचा अभ्यास करून स्वतःचे ज्ञान वाढवणे तुम्हाला आवडते. संशोधन करण्याकडे तुमचा अधिक कल असतो. एकाच वेळी खंबीरपणा व भित्रेपणा असे दोन्ही गोष्टी तुमच्या मध्ये अनुभवास येतात. विचारात आणि वागण्यात स्वतंत्रपणा असतो. धर्मबद्दल स्वतःच्या वेगळ्याच कल्पना असल्याने ठराविक व मान्यवर मार्गाचा अवलंबन करणे तुम्हाला आवडते. स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला आवडतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. कायदे, नियम पाळण्यास आवडते. खेळ व इतर कलांमध्ये भाग घेण्याची आवड असते. अनेकांशी तुमचा संपर्क येत असल्याने बराच वेळ लोकांचे कल्याण करण्यात जातो. दुसऱ्यांनी केलेली टीका तुम्ही फार मनाला लावून घेता. आर्थिक बाबतीत सुदैवी असून पैसे मिळवण्यात यशस्वी होता. आयुष्यात अधिकाराची पदे मिळाल्याने पैशाची कमतरता नसते. बौद्धिक कष्टाचे चीज होते. काही वेळा वारसा हक्काने पण पैसा उपलब्ध होतो.
महिला:- तुम्ही परिस्थितीशी समझोता करणारे व निष्ठावान असतात. तुम्ही चांगल्या माता असून आपल्या मुलांवर व घरावर प्रेम करता. शांतता व आदर याचे तुम्ही प्रतीक असतात. तुम्ही पतीच्या व्यवसायात लुडबुड करीत नाहीत. काही वेळा चमत्कारिकपणा, चंचलपणा याचा प्रत्यय येतो. त्यामुळे घरात कटकटीचे वातावरण निर्माण होऊ शकते.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार शुक्रवार
शुभ रंग:-
पिवळा ,जांभळा ,हिरवा आणि अंजिरी
शुभ रत्ने :- पुष्कराज ,ॲमेथिस्ट लसण्या.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. नियोजनबद्ध कामातून अपेक्षित लाभ मिळेल.
मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल.
कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याची साथ लाभेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. सर्जनशील कार्यात प्रगती होईल.
कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
घरगुती आणि मालमत्तेची कामे मार्गी लागतील. मानसिक समाधान लाभेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.
तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. लहान प्रवासाचा योग संभवतो. भावंडांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
राशीस्वामी गुरूची कृपा लाभेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील.
मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढेल. चंद्र-मंगळ त्रिकोण योगामुळे धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. चंद्र-शनी लाभ योगामुळे आर्थिक आणि व्यावसायिक लाभ मिळेल.
कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांतता लाभेल.
मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
मित्रांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. दिवस समाधानकारक जाईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521