सोलापूर :   अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त  भाविकांची गर्दी 

सोलापूर :   अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त  भाविकांची गर्दी 
  • Positive News
  • मार्च 31 2025

Share on  

सोलापूर :   अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त  भाविकांची गर्दी 
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली आहे. 
सोमवारी  पहाटेपासून शेकडो भाविक श्री स्वामी समर्थांच दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत . श्री स्वामी समर्थ्यांचे दर्शन घ्यायला महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये  दाखल  झाले आहेत.  भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी रंगीबेरंगी फुलांनी, फळांनी सजावट केलेली पाहायला मिळाली.दिवसभरात पादुका अभिषेक, पाळणा, पुष्पवृष्टी, भजन, आरती, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या