भारतातील सर्वात छोटी कम्युनिटी अर्थात लहान समुदाय असलेल्या जैन धर्मींयांकडे एवढे पैसा कुठून येतो? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र, जैन धर्माच्या लोकांच्या वागण्यात आणि त्याच्या रोजच्या जीवन शैलीतच त्यांच्या गर्भ श्रीमंतीचे रहस्य दडलेले आहे.
जैन धर्मीय फक्त पैसे कमवून नाही, तर नाव कमवून, धर्म प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य जपून सर्व बाजूने श्रीमंत असतात. जैन धर्माचे लोक फक्त स्वत:च्या प्रगतीवर फोकस करत नाहीत. जैन धर्मातील लोक त्यांच्या समाज बांधवांना देखील व्यवसायात प्रगती करण्यासाठी मदत करतात. यामुळेच जैन धर्मात कुणाही गरीब नाही.
भारतात पारसी आणि जैन या दोन समुदयाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरिब नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.
गोल्ड इंडस्ट्री, डायमंड इंडस्ट्री, शेअर मार्केट, कमॉडिटी इंडस्ट्री, एयरलाइन इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री, रीयल इस्टेट सेक्टर अशा अनेक क्षेत्रात जैन समाजाची लॉबी पाहायला मिळते. या समाजाचे लोक नोकरी न करता पारंपारिक व्यवसाय पुढे नेतात. व्यवसायाच्या बाबतीतलं नियोजन ते खूप लहान वयातच शिकतात. यामुळे त्यांची प्रगती लवकर होते. प्रगती झाल्यावर हाती पैसासुद्धा लवकर येतो. जैन धर्माचे लोक कोणतेही व्यसन करत नाहीत. चैनीच्या गोष्टी, पार्टी, मौज मजा यावर जैन धर्मीचे लोक पैसा खर्च करत नाही. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते. आपल्याकडचा पैसा ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवतात. यामुळे जैन धर्मीय विविध व्यवसायाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडत राहतात.