जालना : पर्यावरणपूरक धुळवडीची १३६ वर्षांची परंपरा कायम

जालना : पर्यावरणपूरक धुळवडीची १३६ वर्षांची परंपरा कायम
  • Positive News
  • मार्च 14 2025

Share on  

जालना : पर्यावरणपूरक धुळवडीची १३६ वर्षांची परंपरा कायम 
जालन्यात धुलिवंदनानिमित्त निजाम राजवटीपासून सुरु झालेली हत्ती रिसाला मिरवणूक आजही अविरतपणे सुरु आहे. निजाम राजवटीत जालन्यासह परिसरात 20 दिवसांचा होलिकोत्सव साजरा केला जात असे. त्या काळात नाल्याचं पाणी, बैलगाडीचं वंगण, शेण चिखल अंगावर टाकून धुळवड साजरी केली जात असे. त्यामुळं यातून वाद होऊन भांडणं होत होती. त्यामुळं हा विकृत खेळ थांबवण्यासाठी पंधरा ते वीस जणांनी एकत्र येत हत्ती रिसाला मिरवणूक काढली. 136 वर्षांपासून आजही ही परंपरा  कायम आहे.

वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा अपव्यय होउ नये म्हणून कोरडा रंग आणि फुलांची उधळण करीत होळी साजरी केलीय. रिसाला मिरवणूक रंगार गल्लीतून सुरुवात होऊन गोल मस्जिद, सराफा बाजार, फुल बाजार, नया बाजार, बडी सडक राजा रोड आणि पाणी वेस मार्गे परत रंगार खिडकी येथे समारोप होते. यात हत्तीवर बसून प्रतिकात्मक राजाची मिरवणूक काढली. राजा मिरवणुकी दरम्यान लेवढी फेकल्या जाते जनता त्याला आनंदाने प्रसाद म्हणून स्वीकारते. ज्या ज्या भागातून ही मिरवणूक जाते. त्या भागातील लोकं  धुलिवंदन खेळणे बंद करतात. 1889 पासुन तेव्हापासून सुरु झालेली ही 136 वर्षांची पंरपरा आजही कायम आहे.

संबंधित बातम्या