पर्यावरण पूरक उपक्रम: जुन्या साड्यांपासून 5000 पिशव्या वितरित – साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

 पर्यावरण पूरक उपक्रम: जुन्या साड्यांपासून 5000 पिशव्या वितरित – साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
  • Positive News
  • जून 6 2025

Share on  

 पर्यावरण पूरक उपक्रम: जुन्या साड्यांपासून 5000 पिशव्या वितरित – साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम 

अमळनेर - साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले. जुन्या साड्यांपासून बनवलेल्या ५००० कापडी पिशव्या निसर्गमित्र भाजी विक्रेत्यांना भेट म्हणून वितरित करण्यात आल्या. या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण रक्षणाला हातभार लावणे.

 उपस्थित मान्यवर:

या उपक्रमात स्मारकाच्या कार्यात पुढाकार घेणारे खालील विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते –
चेतन भाऊ सोनार, दर्शना ताई पवार, लोकेश वाणी, प्रदीप भाऊ अग्रवाल, नाना धनगर, शिव निकम, श्याम पाटील, उदय पाटील, युनियन बँक मॅनेजर चौधरी सर, शोएब, अख्तर, जावेदा, भारती महाजन, सुरेश महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 उपक्रमाची वैशिष्ट्ये:

  • वर्षभर हा उपक्रम सातत्याने राबविला जाणार आहे.

  • जुन्या साड्यांचा पुनर्वापर करत कापडी पिशव्या तयार करण्यात येणार आहेत.

  • पर्यावरण रक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव वाढवण्याचा हा प्रयत्न आहे.

 आपण काय करू शकता?

आपल्या घरात जुन्या साड्या असल्यास, त्या दर्शना पवार यांच्याकडे सुपूर्त कराव्यात.
हा उपक्रम आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आहे!

 पर्यावरण वाचवा – पर्यावरण मित्र बना!
  संपर्क: 9075570510

साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठानच्या “पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि संगोपन” ग्रुपमध्ये सहभागी व्हा!

संबंधित बातम्या