राज्यात पावसाचा मुक्काम २७ जुलैपर्यंत; पुणे घाटमाथ्यास 'रेड अलर्ट', कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पावसाचा मुक्काम २७ जुलैपर्यंत; पुणे घाटमाथ्यास 'रेड अलर्ट', कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
  • Positive News
  • जुलै 22 2026

Share on  

राज्यात पावसाचा मुक्काम २७ जुलैपर्यंत; पुणे घाटमाथ्यास 'रेड अलर्ट', कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : राज्यातील पावसाचा जोर कायम असून सोमवार, २७ जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम वाढल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार, २२ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यास अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून, काही भागांत जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राज्यातील इतर भागांतही पावसाची हजेरी लागल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्हानिहाय हवामान अलर्ट

  • कोकण (२२ ते २७ जुलै) : ऑरेंज अलर्ट – मुसळधार पावसाचा इशारा.

  • मध्य महाराष्ट्र

    • २२ जुलै : रेड अलर्ट – अतिमुसळधार पावसाची शक्यता.

    • २३ ते २७ जुलै : हलका ते मध्यम पाऊस.

  • विदर्भ (२३ ते २७ जुलै) : यलो अलर्ट – मध्यम ते मुसळधार पाऊस.

  • मराठवाडा (२३ ते २७ जुलै) : हलका ते मध्यम पावसाची शक्यता.

गत २४ तासांतील प्रमुख पावसाची नोंद (मि.मी.)

कोकण : मंडणगड १७०, माथेरान ११५, पनवेल ११०, लांजा १०७, वाडा १०६, चिपळूण १०५, ठाणे १०१, खेड ९८, संगमेश्वर (देवरुख) ९४, सांताक्रूझ ८८, गुहागर ८७, भिवंडी ८१, श्रीवर्धन ८०, राजापूर ७७, वाकवली ७५, सुधागड (पाली) ६९, दापोली ६८, पोलादपूर ६७, विक्रमगड ६५ आणि उल्हासनगर ६४.

मध्य महाराष्ट्र : राधानगरी १२४, महाबळेश्वर १०८, गगनबावडा ८७, गारगोटी ३७, लोणावळा ३७, आजरा व पन्हाळा प्रत्येकी ३५, कोल्हापूर ३०.

मराठवाडा : माहूर ३०, वाशी १२, कन्नड व हिमायतनगर प्रत्येकी ९, औसा ८.

विदर्भ : साकोली ४८, भामरागड व तुमसर प्रत्येकी ३१, भंडारा २८, सडक, कळमेश्वर, अमरावती व रिसोड प्रत्येकी २१, पांढरकवडा व लाखनी २०, घाटंजी १९, लाखांदूर १८, मोशी, देसाईगंज व एटापल्ली प्रत्येकी १६, सावनेर १५, नरखेड १३ आणि सिरोंचा ११.

घाटमाथा : कोयना १७१, भिरा १५०, डोंगरवाडी १०७, ताम्हिणी १०२, दावडी ८८, शिरगाव ८०, अंबोणे ६५, लोणावळा ४०, धारावी ३६, वळवण ३४, खोपोली व खंडाळा प्रत्येकी २७, तर लोणावळा परिसरात २३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

नागरिकांना आवाहन

हवामान विभागाने घाटमाथा, कोकण आणि अतिवृष्टीच्या शक्यतेच्या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

⚠️ डिस्क्लेमर :
ही बातमी भारतीय हवामान विभाग (IMD) तसेच उपलब्ध अधिकृत हवामान अंदाज आणि प्राप्त माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. हवामानाची परिस्थिती वेळोवेळी बदलू शकते. आपल्या परिसरातील अद्ययावत सूचना, इशारे आणि प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे. या माहितीचा उद्देश केवळ जनजागृती व माहिती देणे हा आहे.

संबंधित बातम्या