--II ● विवेक विचार ● II--

--II ● विवेक विचार ● II--
  • Positive News
  • मे 21 2025

Share on  

               --II ● विवेक विचार ● II--
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९१२ वा दिवस

                    एखादा प्रचंड वृक्ष सुंदर व परिपूर्ण फल निर्माण करतो. ते फल पक्व होऊन जमिनीवर पडते, कुजते व त्यातून भावी वृक्षाचा अंकुर वर येतो. तो वृक्ष पहिल्या वृक्षाहून कदाचित अधिक प्रचंड रूप धारण करतो. या ज्या पतनाच्या कालखंडातून आपल्याला जावे लागले तो कालखंड आवश्यकच होता. या पतनातूनच भावी काळातील भारत जन्माला येत आहे. तो अंकुरित होत असून त्याची पहिली कोवळी पाने केव्हाच बाहेर पडली आहेत आणि भविष्यातील एक बलवान, विशाल, महाकाय व ऊर्ध्वमूल असा आश्वस्त वृक्ष येथे दिसू लागलेला आहे.
                          स्वामी विवेकानंद...                                     
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ३१ वैशाख शके १९४७
★ वैशाख वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २१ मे २०२५                                       
★ १९९१ भारतात माहीती तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवणारे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेराम्बदुर येथे हत्या. स्मृतीदिन
★ जागतिक दहशतवाद विरोधी दिन...
संकलन - प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

संबंधित बातम्या