मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा; जवानांशी थेट संवाद साधला
गडचिरोली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील कवंडे येथील पोलिस स्टेशन आणि आऊटपोस्टचा दौरा केला. त्यांनी यावेळी सी.आर.पी.एफ., एस.आर.पी.एफ. व सी-60 कमांडो दलातील जवानांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कार्याबाबत माहिती घेतली आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
दौऱ्यादरम्यान राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीतील नक्षलप्रभावित भागात सुरक्षा यंत्रणा सक्षमपणे कशी कार्य करत आहे, याचा आढावा घेतला. त्यांनी जवानांच्या मनोबलाचा गौरव करत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासनही दिले.
गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात पोलिस व निमलष्करी दलाच्या सतर्कतेमुळे शांती आणि विकासाचे वातावरण निर्माण होत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.