भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १३ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १३ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला.
  • Positive News
  • ऑगस्ट 16 2026

Share on  

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १३ व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला.

दिल्ली : लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच 'वंदे मातरम्' गीताचे सूर निनादले. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होईपर्यंत, २०४७ पर्यंत आपण एक 'विकसित भारत' घडवू. जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा जगाला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या. देशाचे वर्क कल्चर बदलण्याची गरजही मोदींनी यावेळी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन
- स्वातंत्र्यलढ्यात सहभागी क्रांतिकारकांना नमन करतो
- देशातील काही भागांना पूरस्थितीला सामोरं जावं लागलं, पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी
- आज तिरंगा प्रत्येक घरात आणि प्रत्येक हृदयात आहे; आपण उत्साह, जिद्द आणि नव्या संकल्पांसह पुढे जात आहोत.
- जेव्हा एखादा देश आपली स्वप्ने साकार करतो आणि दृढ निश्चय व क्षमतेच्या बळावर पुढे वाटचाल करतो, तेव्हा तो महान बनतो. केवळ लहान स्वप्नांच्या आधारे एखादा देश आता तग धरू शकत नाही; भव्य स्वप्ने आपली क्षितिजे विस्तारतात. आपला निश्चय अढळ असायला हवा.
- आज भारतानेही एका दृढ निश्चयासह एक भव्य स्वप्न पाहिले आहे: ते म्हणजे, १९४७ पासूनq स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होईपर्यंत आपण एक 'विकसित भारत' घडवू. जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा जगाला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे भाग पडते.
- अवघ्या १२ वर्षांच्या कालावधीत २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. या १२ वर्षांत आपण एक प्रमुख आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलो आहोत. आणि आता, १४० कोटी भारतीयांचा संकल्प रोखणे कठीण आहे.
- गेल्या १२ वर्षांत संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात चारपट, खादी व ग्रामोद्योगांच्या उत्पादनात पाचपट आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सातपट वाढ झाली आहे. रेल्वे डब्यांच्या निर्मितीत २१ पट आणि मोबाईल फोनच्या उत्पादनात ३३ पट वाढ झाली. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या चौपट झाली, तर डिजिटल व्यवहारांमध्ये १०० पट वाढ झाली.
- नळाद्वारे पाणीपुरवठा जोडण्या देण्याचा सरासरी वार्षिक वेग १५a पटींनी वाढला आणि गॅस जोडण्याqa पूर्वीच्या वेगाच्या तुलनेत सहापट अधिक वेगाने देण्यात आल्या. शौचालयांच्या बांधकामाचा वार्षिक वेग चौपट झाला आणि गरिबांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचे काम दरवर्षी तीनपट अधिक वेगाने झाले.
- भारताने आता इतर देशांवर अवलंबून राहू नये; त्याने आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. जागतिक बाजारपेठेतून वस्तू कदाचित स्वस्त आणि जलद गतीने उपलब्ध होत असल्या, तरी त्यावर अवलंबून राहिल्याने आपली स्वतःची ताकद वाढत नाही; म्हणूनच, आपण आपली क्षमता वाढवली पाहिजे आणि आपल्या हितांचे रक्षण स्वतःच केले पाहिजे.
- ऊर्जेचे महत्त्व वाढले आहे; त्याशिवाय आधुनिक जग चालवणे कठीण आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे. ऊर्जा सुरक्षा ही काळाची गरज आहे. आम्ही संसदेत 'ऊर्जा संवर्धन कायदा' मंजूर केला असून, २०४७ पर्यंत १०० गिगावॅटचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहोत.


देशाला कच्च्या तेलावर अवलंबून राहावे लागले आहे आणि याचे कारण म्हणजे एक सदोष मानसिकता. आपण आपल्या किनारपट्टीचा ९९ टक्के भाग 'नो-गो' क्षेत्र म्हणून निश्चित केला होता, परंतु हा दृष्टिकोन दीर्घकाळासाठी टिकण्याजोगा नाही, असे आपण ठरवले. त्यामुळेच आपण ही 'नो-गो' क्षेत्रे खुली केली आणि आता समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात नवीन साठ्यांचा शोध घेत आहोत. गेल्या वर्षी आपण 'समुद्र मंथन'ची घोषणा केली आणि ८५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा संकल्प केला.
- २०१४ पूर्वी ७० शहरांमध्ये पाईपद्वारे गॅसचा पुरवठा केला जात असे. गेल्या १२ वर्षांत आम्ही ७०० शहरांमधील १.७५ कोटी घरांपर्यंत पाईप गॅस जोडण्यांचा विस्तार केला आहे. २०१४ पूर्वी सौर ऊर्जेची क्षमता केवळ २ गिगावॅट होती; आज ती १६० गिगावॅट इतकी आहे. आम्ही 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' सुरू केली. सध्या ५० लाख घरांमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. याचा परिणाम म्हणून, हजारो घरांची वीज बिले शून्य झाली आहेत आणि लोक वीज विकून उत्पन्नही मिळवत आहेत.
- आम्ही रेल्वे जाळ्याच्या ७० टक्के भागाचे विद्युतीकरण केले आहे. विजेवर गाड्या चालवल्यामुळे पर्यावरणाला फायदा झाला आहे. देशाने आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वेगाडी सुरू केली आहे. ही सर्वात लांब रेल्वेगाडी आहे.
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाची सुरुवात सशस्त्र दले आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांनी पंतप्रधान मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर'(मानवंदना) देत केली. पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीताची धून वाजली.

त्यानंतर २१ तोफांची सलामी देत भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर्समधून पुष्प वर्षाव करण्यात आला. २,५०० एनसीसी कॅडेट्स आणि 'माय भारत'च्या स्वयंसेवकांनी 'ज्ञानपथा'वर 'वंदे मातरम्'चा आकार साकारला.

या कार्यक्रमासाठी १५,००० ते २०,००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १,००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जात आहे.

या कार्यक्रमास सुमारे ५,००० विशेष अतिथी उपस्थित राहिल्याचा अंदाज आहे. २०२६ मधील आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित ऑलिम्पियाडमध्ये पदके जिंकणाऱ्या १९ विद्यार्थ्यांचा सत्कार केला जात आहे. तरुण नवोन्मेषक (इनोव्हेटर्स), 'पंतप्रधान इंटर्नशिप योजने'अंतर्गतचे इंटर्न्स आणि स्टार्टअप्सशी संबंधित तरुणांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 'पंतप्रधान कौशल्य विकास योजने'अंतर्गत प्रशिक्षण घेतलेले तरुण आणि 'माय भारत'चे स्वयंसेवकही यात सहभागी झाले आहेत.

संबंधित बातम्या