पुणे : What did Rahul Gandhi say? : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मांजरी या ठिकाणी शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे जवळपास वेगवेगळ्या ४० मागण्या केलेल्या आहेत. आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही.
या घडामोडीनंतर आता आदिवासी विद्यार्थ्यांच्या या उपोषण आंदोलनाची दखल थेट लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. पुण्यात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याची आणि सरकारने तातडीने दखल घेण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राहुल गांधी यांनी काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधींनी पत्रात म्हटलं की, 'महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी १० दिवसांपेक्षा जास्त काळापासून उपोषणाला बसले आहेत. तरीही सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. पुण्यातील 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनींनी वसतिगृहांसाठी लादण्यात आलेली वयोमर्यादा, तसेच अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधा आणि गर्भधारणा चाचणी असे अनेक मुद्दे मांडलेले आहेत.'
लोकसभा में विपक्ष के नेता और कांग्रेस सांसद राहुल गांधी ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखा है।