मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्थापन झालेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यातील सहाही विभागांमध्ये विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक आणि संबंधित हितधारकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
भरती परीक्षा सुधारणांसाठी गठित करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना (पुणे - 12 सप्टेंबर, नागपूर - 16 सप्टेंबर, अमरावती - 17 सप्टेंबर, छत्रपती संभाजीनगर - 21 सप्टेंबर, कोकण - 29 सप्टेंबर व नाशिक - 30 सप्टेंबर) भेट देऊन संवाद साधणार आहे.
या संवादातून प्राप्त सूचना, अडचणी आणि अभिप्रायांचा अभ्यास करून भरती परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला आवश्यक सुधारणांबाबत शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.