झापुक झुपूक' सिनेमाची २ दिवसात ४८ लाखांची कमाई

झापुक झुपूक' सिनेमाची   २ दिवसात ४८ लाखांची कमाई
  • Positive News
  • एप्रिल 28 2025

Share on  


झापुक झुपूक' सिनेमाची   २ दिवसात ४८ लाखांची कमाई 

झापुक झुपूक' सिनेमाची  सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात सूरज चव्हाण  प्रमुख भूमिकेत आहे. सूरज हा प्रसिद्ध रील स्टार म्हणून नावारुपास आला. पण नंतर मात्र बिग बॉस मराठी सीझन ५ चं विजेतेपद जिंकून सूरजने सर्व महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलं.याच मंचावर केदार शिंदेंनी सूरजला घेऊन सिनेमा काढणार असल्याचं जाहीर केलं. अखेर केदार यांनी दिलेला शब्द पाळला आणि सूरजला घेऊन 'झापुक झुपूक' हा सिनेमा बनवला. हा सिनेमा हिट झालाय की फ्लॉप झालाय, हे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे सांगतील.

'झापुक झुपूक' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

sacnilk ने दिलेल्या अहवालानुसार, 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी २४ लाखांची कमाई केली. याशिवाय दुसऱ्या दिवशीही 'झापुक झुपूक' सिनेमाने २४ लाखांची कमाई केली. अशाप्रकारे दोन दिवसांमध्ये 'झापुक झुपूक' सिनेमाने ४८ लाखांची कमाई केलीय. आज रविवार असल्याने या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 'झापुक झुपूक' निमित्ताने सर्व नवोदित कलाकारांसोबत केदार शिंदेंनी सिनेमा बनवलाय. एकूणच ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांना तो खूप आवडल्याचं दिसतंय.

संबंधित बातम्या