आजचे राशीभविष्य आणि शेवटी आज जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
मंगळवार, १० जून २०२५. ज्येष्ठ पौर्णिम. विश्वावसुनाम संवत्सर. शके १०४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी ३.० ते दुपारी ४.३०
चंद्र नक्षत्र - अनुराधा/ज्येष्ठ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. (विष्टी करण शांती करून घ्यावी)
"आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे." वटपौर्णिमा
मेष:- अष्टम स्थानी चंद्र आहे. शत्रू पराभूत होतील. स्त्री धन वाढेल. अनैतिक कामे करू नका.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराचा सल्ला मानावा लागेल. संभ्रम निर्माण करणाऱ्या घटना घडतील.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. प्रवास घडतील. आर्थिक लाभ होतील. अध्यात्मिक प्रगती घडेल.
कर्क:- घरगुती काम पूर्ण होईल. शेअर्स मधून बरे लाभ मिळतील. अचानक धनलाभ संभवतो.
सिंह:- अर्थकारण भक्कम होईल. येणी वसूल होतील. नोकरीत त्रास होऊ शकतो. घरगुती कामे कराल.
कन्या:- आरोग्याचे प्रश्न सुटतील. व्यावसायिक यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. अंदाज अचूक ठरतील.
तुळ:- यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना चांगला दिवस आहे. वक्तृत्व चमकेल.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. भगिदरी व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. काही अप्रिय अनुभव येतील. प्रवासाचे नियोजन बदलेल. खर्च वाढू शकतो.
मकर:- लाभ स्थानी चंद्र आहे. बढतीचे योग आहेत. नोकरीत चांगल्या घटना घडतील. शेअर्स मध्ये जपून निर्णय घ्या.
कुंभ:- अनुकूल ग्रहमान आहे. आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. कामाचा वेग वाढेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. अति धाडस नको. दानधर्म करा. सिद्धी प्राप्त होतील. तीर्थाटन घडेल. सरकारी कामे मार्गी लागतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
१० जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांची परीक्षा झटकन करू शकतात. तुमचा सल्ला योग्य असतो. तुम्ही अत्यंत अभ्यासू असून नीटनेटके आहात. तुम्ही जबाबदारीच्या जागांवर चांगले काम करू शकतात. तुमचा स्वभाव काहीसा बढाईखोर आहे. तुम्ही इतरांना मदत करतात मात्र इतरांकडून तुम्हाला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. तुम्ही दर्जेदार वस्तूंचा आग्रह धरतात. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला शास्त्राची आवड आहे. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. खेळण्याची हौस आहे. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला आवड आहे. तुम्ही जे कार्य हातात घेतात त्यात तुम्हाला यश मिळते कारण तुमचे नियोजन चांगले असते. तुम्हाला गूढ विद्यांची देखील आवड आहे. तुम्ही कलाकार आणि कलाप्रिय आहात. सौंदर्याबद्दल तुम्हाला नैसर्गिक आकर्षण आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही लोकप्रिय असतात. नीती आणि आणि अनीती याबद्दल तुमच्या कल्पना जरा वेगळ्या आहेत. तुम्ही सतत उद्योग मग्न असतात. तुम्ही कायम उत्साह मूर्ती असतात. इतरांचा तुम्ही आदर करतात. इतरांना तुम्ही तणावापासून मुक्त करतात. तुम्ही फार सखोल अभ्यास करणारे जरी नसले तरी तुमचे वक्तृत्व चांगले असते. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुम्ही संशोधक असाल आणि त्याचा जगाला कसा फायदा होईल याचा विचार करतात. तुम्ही जसे व्यवहारी आहात तसे दानधर्म करणारे देखील आहात. तुम्ही हट्टीपणा आणि उतावळेपणा टाळला पाहिजे.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, चित्रपट निर्माते, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, इंटेरियर डिझायनर, दिग्दर्शक, बँकिंग, औषधाचे दुकान, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, वकिली.
शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521