असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य रविवार, २४ मे २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य रविवार, २४ मे २०२६
  • Positive News
  • मे 24 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य रविवार, २४ मे २०२६
अधिक ज्येष्ठ नवमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
 (संपर्क - 8087520521)

 राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

"आज चांगला दिवस आहे."

 चंद्रनक्षत्र - पूर्वा फाल्गुनी.
 आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. (हर्षण योग - अशुभ)

 चंद्र केंद्र बुध.

टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) पंचम स्थानी चंद्र आहे. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात यश लाभेल. चंद्र केंद्र बुध योगामुळे बौद्धिक क्षमता वाढेल. महत्त्वाच्या चर्चांमध्ये तुमचे मत प्रभावी ठरेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरण आनंददायक राहील. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत लाभ संभवतो. गृहसजावटीकडे लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना समाधान मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) उत्साह वाढवणारा दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. चंद्र केंद्र बुध योगामुळे लेखन, शिक्षण आणि संवाद क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आर्थिक बाबतीत अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसोबत आनंददायक वेळ जाईल. धार्मिक आणि पारंपरिक कार्यात सहभागी व्हाल. आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल. बोलण्यात संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना किंवा कल्पना मांडाल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. चंद्र केंद्र बुध योगामुळे बुद्धिमत्तेच्या जोरावर कामात यश मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ चांगला जाईल.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढू शकतो. मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहणे आवश्यक आहे. काही जुन्या आठवणी मनाला अस्वस्थ करतील. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासात सावधगिरी बाळगा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक आवक वाढेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. काही सुखद धक्के मिळू शकतात. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. यंत्र हाताळताना काळजी घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) दशम स्थानी चंद्र आहे. दिवस धावपळीचा राहील. कामातील गुंतागुंत वाढेल पण त्यातून प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात चर्चेत राहाल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भाग्यस्थानी चंद्र आहे. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. कनिष्ठ सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. भाग्याची साथ लाभेल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) अष्टम स्थानी चंद्र आहे. मानसिक ओढाताण जाणवू शकते. प्रवास टाळणे हिताचे ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आध्यात्मिक विचार मनात येतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात काही गैरसमज संभवतात. जोडीदारासोबत संयमाने वागा. भागीदारी व्यवसायात सावध राहणे आवश्यक आहे. जपजाप्य आणि उपासना केल्यास मानसिक समाधान लाभेल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. विरोधकांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. महिलांकडून सहकार्य लाभेल. संयम आणि शांततेने काम केल्यास दिवस समाधानकारक जाईल.

कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या