शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांसाठी आज मतदान, 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला!

शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांसाठी आज मतदान, 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला!
  • Positive News
  • ऑक्टोबर 23 2026

Share on  

शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांसाठी आज मतदान, 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला!

अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी (Election 2026) आज म्हणजेच शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, पाच जागांसाठी एकूण 182 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचं भवितव्य आज मतपेटित कैद होणार आहे. यात पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ, तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान, पाचही मतदारसंघांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर पाचही मतदारसंघांसाठी दोन हजार 419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून 10 लाख 68 हजार 72 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे आज मतदानातून मतदारराजा कोणाला कौल देतो आणि विधान परिषदेच्या मैदानात आता नेमकं कोण बाजी मारणार हे आता निकालाअंती समजणार आहे.

राज्यात आज (23 ऑक्टोबर) विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी मतदान होतंय. पाच जागांसाठी 182 उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झालीये. त्यातच महायुतीमध्ये झालेली बंडखोरी आणि पक्षांतर्गत नाराजीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची धास्ती वाढलीेय. तर मविआमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पदवीधरच्या 3 जागांसाठी तर शिक्षक मतदारसंघाच्या 2 जागांसाठी ही निवडणूक होतेय. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर पदवीधरसाठी, तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी 8 जिल्ह्यात मतदान होतंय. पुणे शिक्षक आणि पदवीधरसाठी पुणे,सोलापूर,सातारा,सांगली,कोल्हापूर या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम इथे मतदान होतंय. तर नागपूर पदवीधरसाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली इथे मतदान होत आहे.
 

संबंधित बातम्या