नाशिकच्या वॉटर्स ऐज बोट क्लबच्या बारा खेळाडूंची राष्ट्रीय सब ज्युनियर रोईंग स्पर्धेसाठी निवड
नाशिक : नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेतून दिनांक २७ मे ते ३१ मे २०२५ दरम्यान हैद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर रोईंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली त्यात नाशिकच्या वॉटर्स ऐज बोट क्लबच्या १२ खेळाडूंनी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले व आपली उज्वल परंपरा कायम ठेवली.
महाराष्ट्र संघात निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे
मुलांची: कॉडरेबल स्कल : अविनाश पाटील, चाणक्य चौधरी, स्वयम पवार, आरोय पवार
कॉकलेस फोर : पियुष मंडलिक, आयुष धोंगडे, सोहम तांबे, कल्पक वाघ
मुलींची कॉडरेबल स्कल : रेवा गवळी, वैष्णवी शेलार, कनिष्का पवार, सुदर्शनी बोराडे.
तसेच सदर संघाच्या संघ व्यवस्थापक म्हणून बोट क्लबच्या स्मिता तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर दिनांक ६ मे ते २५ मे २०२५ दरम्यान वॉटर्स ऐज बोटक्लब येथे बोटक्लबचे महाराष्ट्र शासन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे , पूजा जाधव , प्रशिक्षक अविनाश देशमुख, अनिकेत तांबे, राहुल काकड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. सदर स्पर्धा पूर्व सराव शिबिराच्या नुकताच समारोप कॅनो कायाकिंग या खेळाच्या आंतरराष्ट्रीय पंच व जम्मू काश्मीर वॉटर स्पोर्ट्स खेळाच्या अध्यक्ष बिल्कीस मीर यांच्या प्रमुख उपस्थितीत व बोट क्लबचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक श्री. विक्रांत मते यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशिक्षक अंबादास तांबे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक) यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी जम्मू काश्मीर वॉटर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि कायाकिंगखेळाचे आंतरराष्ट्रीय पंच श्रीमती बिल्कीस मिर यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आणि या खेळातील तांत्रिक बाबीं बाबत मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच जम्मू काश्मीर व नाशिकच्या वॉटर्स ऐज बोट क्लबचे खेळाडू व जम्मू-काश्मीरचे वॉटर स्पोर्टचे खेळाडू या खेळाडूंमध्ये खेळाडू एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत सराव करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली व तसेच नाशिक सारख्या शहरात वॉटर स्पोर्टची इतकी उत्तम सुविधा बघून त्यांनी आनंद व्यक्त केला व तसेच कोणतीही शासकीय मदत न घेता एका कुटुंबाच्या सामाजिक दायित्वातून अशा प्रकारचा उत्तम असे वॉटर स्पोर्टचे प्रशिक्षण केंद्र उत्तमरीत्या चालवले जाते याबाबत त्यांनी संस्थापक मा. माजी महापौर प्रकाश मते व माजी नगरसेवक विक्रांत मते यांचे विशेष कौतुक केले व अशा प्रकारे जर प्रत्येक शहरात असे सामाजिक दायित्वातून खेळाच्या सुविधा उपलब्ध केल्या तर नक्कीच पुढील काही काळात आपला देश खेळामध्ये ऑलम्पिक आपली प्रगती निश्चितच उंचावेल.
यावेळी बोट क्लबचे राष्ट्रीय खेळाडू व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते त्यांनी देखील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.