आजचे राशिभविष्य आणि आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये:-
शुक्रवार, ४ एप्रिल २०२५. चैत्र शुक्ल सप्तमी. वसंत ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज उत्तम दिवस आहे"
चंद्र नक्षत्र - आर्द्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मंगळ आणि शनीचा हर्षलशी शुभ लाभ योग आहे. व्यावसायिक घडी बसेल. करार यशस्वी होतील. उत्तम सहकार्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. सरकारी कामाना गती मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. मन आनंदी राहील. कलाकारांना चांगला दिवस आहे. शनीची अनुकूलता विशेषत्वने जाणवेल. सत्संग घडेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आर्थिक आवक चांगली होईल. मान सन्मान मिळतील. प्रवास घडतील. अचानक लाभ होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. चंद्राची अनुकूलता नाही. उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. वाऱ्याची हलकीशी झुळूक यावी तशी एखादी बातमी येईन.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. तुम्हाला आयुष्य भरभरून जगायला आवडते. आज नेतृत्व कराल. मन आनंदी राहील. व्यावसायिक क्षेत्रात प्राबल्य गाजवाल. लॉटरीतून किंवा शेअर्स मधून यश मिळू शकेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दशम स्थानी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी एक वेगळाच उत्साह जाणवेल. रेंगाळली कामे पूर्ण कराल. नवनवीन संधी चालून येतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नववा चंद्र आहे. व्यावसायिक लाभ होतील. अडचणी दूर होतील. पर्यटन घडेल. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. मात्र आर्थिक भरभराट होईल. गुपिते उघड करू नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चांगला दिवस आहे. संपत्ती वाढेल. स्पर्धेत यश मिळेल. तिजोरीत भर पडेल. नवीन वास्तूचे योग आहेत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. भागीदारी व्यवसायात लाभ होतील. एखादे मोठे संकट थोडक्यात निभावून जाईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल ग्रहमान आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक वाढेल. शेती विक्रीतून लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चतुर्थ चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. अधिकार वाढतील. एखाद्या सिद्ध पुरुषाची अचानक भेट होऊ शकते. आचरण पवित्र ठेवा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
४ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्या जीवनात बरेचदा विरोधाभास जाणवतो. आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवास येतात. अनेक विलक्षण आणि चमत्कारीक घटना तुमच्या आयुष्यात घडत असतात. तुम्ही तुमच्या राहत्या जागेत, नोकरी व्यवसायात सतत बदल करत असतात. त्यामुळे कधीकधी आयुष्यात अस्थिरता निर्माण होते. तुमच्या मध्ये उत्साह आहे आणि तुम्ही सतत प्रगती करत असतात. तुमच्या मनाचे पातळी उच्च दर्जाची आहे. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी तुम्ही योगदान देतात. रूढी आणि बंधने किंवा परंपरा यांचा तुम्हाला तिरस्कार असतो. तुम्ही सच्चा मनाचे असतात आणि खोटेपणा तुम्हाला आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. तुमचा स्वभाव परखड आहे. त्यामुळे अनेकदा तुमचे विचार इतरांना पटत नाही. समोरची व्यक्ती दुखावली तरी चालेल मात्र आपला स्पष्टवक्तेपणा तुम्ही सोडत नाहीत. त्यामुळे अनेकदा मित्रांचा गैरसमज होतो. तुम्ही अहंकार आणि उद्धटपणा टाळला पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या धोक्यांना तुम्ही घाबरत नाही आणि यशस्वीपणे तोंड देतात. तुमचा मित्रपरिवार मोठा असतो. घरातून किंवा कौटुंबिक संबंधातून तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो.
व्यवसाय:- कारखाना, बौद्धिक क्षेत्र, गणित, इंटरियर डिझाईन, संचालक, आयात-निर्यात, बँकिंग, बांधकाम व्यवसाय, नाक कान डोळे तज्ञ.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा.
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521