आज जागतिक आरोग्य दिवस...."निरोगी सुरुवात आशादायक भविष्य", माता आणि बालक संगोपन

आज  जागतिक आरोग्य दिवस....
  • Positive News
  • एप्रिल 7 2025

Share on  

जागतिक आरोग्य दिवस...."निरोगी सुरुवात आशादायक भविष्य", माता आणि बालक संगोपन

आज ७ एप्रिल ..जागतिक आरोग्य दिवस. हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.
आणि या वर्षीची थीम आहे
निरोगी सुरुवात.... आशादायक भविष्य यामध्ये माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी वर्षभर  वेगवेगळ्या प्रकारे मोहीम राबविली जाईल.

विविध आजारांबद्दल, मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांची गरज याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे.

माता आणि नवजात बालकांना आनंदी आणि निरोगी ठेवण्यासाठी, योग्य ती काळजी घ्या:  वेळेवर झोपा, वेळेवर आहार घ्या, स्तनपानाला प्रोत्साहन द्या, लसीकरणाला प्रोत्साहन द्या आणि स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण राखा.

मातांसाठी:

प्रसूतीपूर्व काळजी:
गरोदरपणात आईच्या आरोग्यावर आणि बाळाच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पोषण:
आईच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हानीकारक पदार्थ टाळा:
गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणानंतर धूम्रपान, जास्त कॉफी, अल्कोहोल आणि अनावश्यक औषधांचे सेवन टाळा.

 लसीकरण:
गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांनी शिफारस केलेल्या लसी आईने  घेणे गरजेचे असते.

मानसिक आरोग्य:

प्रसुतिपूर्व  अवस्थेमध्ये नैराश्य येऊ शकते त्यामुळे मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी प्राणायाम,  ध्यानधारणा, स्माईल मुद्रा मेडिटेशन करणे गरजेचे आहे.

आनंदी आणि निरोगी बाळासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई आणि नवजात बालकांना एकत्र ठेवणे, जेणेकरून  आई आणि बाळाचा एकमेकांना स्पर्श होत राहील, ही बाळाची भावनिक गरज असते.  स्तनपान केल्याने  बाळाची प्रतिकारशक्ती वाढते 

गरोदरपणात उपयुक्त ठरणारी मुद्रा
सुजोक थेरपी ट्रायओरिजिन स्माईल मुद्रा मेडिटेशन मध्ये, एक मुद्रा आहे जी माता आणि बाळाला निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये संपूर्ण गरोदरपणात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा  हाताचे मधले बोट आणि अंगठा एकमेकांना जोडून दोन्ही हातांनी मुद्रा करायची आणि छानसं स्माईल करायचं. 
आनंदी आई तर निरोगी बाळ हे सूत्र आहे
चला तर आपण एकत्र येऊया आणि याबद्दल जागरूकता पसरवूया जेणेकरून आपण भारताचे निरोगी भविष्य घडवू शकू.

डॉ अंजली जाधव, ठाणे

संबंधित बातम्या