महिलांसाठी ज्योतिष:-सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाइल 9272311600शनिवार, 8 मार्च 2025. फाल्गुन शुक्ल नवमी/दशमीराहुकाळ - सकाळी 9 ते 10:30आज चांगला दिवस,जागतिक महिला दिन आज जन्मलेल्या बाळाची राशी मिथुन.8 मार्च रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर गुरू आणि शनि या ग्रहांचा प्रभाव आहे.
गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे शनी ग्रहाच्या नैराश्य तुन तुम्ही काही प्रमाणात का होईना दूर जाता. शिस्त, गांभीर्य ,दृढपणा कर्तव्याची जाणीव ही तुमची वैशिष्ट्ये आहे .तुम्ही विचारी व स्थिर वृत्तीचे असतात. कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू तुम्ही जाणून घेता. बऱ्याच वेळा तुम्हाला एकाकीपणा जाणवतो. तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात निसर्ग सौंदर्य व फुले याबद्दल ओढ असते .शास्त्रीय संगीताची आवड असून गंभीर संगीत जास्त आवडते .इतर लोकांपेक्षा तुम्ही अधिक धोरणे व हुशार असतात .महत्त्वाकांक्षी असून सतत कामात व्यस्त राहणे आवडते .तुम्ही कार्यशील कार्यक्षम व अधिकार गाजवणारे असता. गरिबांविषयी आदर आपुलकी असते .जन्मता उत्तम व्यवस्थापक असल्यामुळे इतरांकडून काम करून घेणे जमते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडचणी व विलंब याचा जीवनात भरपूर अनुभव येतो .पैशाच्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक नियोजन केले जाते .इतर लोकांना ज्यावेळेस मदतीची जरूर असते तेव्हा ते तुमच्याकडे येतात याचे कारण म्हणजे तुम्ही त्यांचे दुःख उत्तम तऱ्हेने समजू शकता .कौटुंबिक सुखाचा उपभोग घेणे, त्याचप्रमाणे मुले नवरा यांच्या महत्त्वकांक्षासाठी त्याग करणे तुम्हाला आवडते .तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीर असतो. लोकप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते .चांगली पत्नी म्हणून तुमचे कौतुक होते ,पण अल्लड स्वभावामुळे प्रेमात अडचणी येऊ शकतात.
शुभ दिवस:- बुधवार ,गुरुवार शनिवारशुभ रंग - राखाडी गडद निळा किंवा काळाशुभ रत्ने:- नीलम
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली नीट तपासून घ्या)आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज सरकारी कामात लाभ होतील.क्रोध टाळा.
वृषभ:-मैत्रिणींनो आज मनाप्रमाणे कामे होतिल. आरोग्य जपा.
मिथुन:- मैत्रिणींनो आज तुमच्याच राशीत चन्द्र आहे.मानसन्मान मिळेल.प्रवासाचे योग. कमीतकमी बोला.
कर्क:-मैत्रिणींनो आज रुटीन चालू ठेवा. महत्वाची कामे पुढे ढकला.खर्च वाढेल.
सिंह:-मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस.पतीचे सहकार्य मिळेल.वाहन काळजीपूर्वक चालवा.
कन्या:- मैत्रिणींनो आज पतीशी कुरबुरी होऊ शकतात. कामात मन लागणार नाही.
तुळ:-मैत्रिणींनो आज कामातल्या अडचणी दूर होतील.आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस.गुप्तशत्रूंच्या कारवायाचा त्रास होईल.
धनु:-मैत्रिणींनो आज लेखनातून प्रसिद्धी मिळेल.पतीकडून लाभ होतील.
मकर:- मैत्रिणींनो आज मोठे व्यवहार होतील.पतीकडून भेटवस्तू मिळेल.
कुंभ:- मैत्रिणींनो आजही उत्तम आर्थिक लाभ होतील.नात्यातील नाराजी दूर कराल.महत्वाचे निर्णय आज नको.
मीन:- मैत्रिणींनो आज सावधतेने वाटचाल कराल.निर्णय घाईगडबडीत नकोत.शत्रूचे भय राहील.सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाईल 9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.