असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १५ जून
आज ज्यांचा जन्म झाला आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आणि शेवटी आजचे राशिभविष्य :-
१५ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही एक हुशार आणि बुद्धिमान कलाकार असतात. तुमच्या कलेतून तुमचे आर्थिक प्राप्ती होते. मोठेपणा, प्रतिष्ठा याना तुम्ही अवास्तव महत्व देतात. तुम्ही धैर्यवान आहात. रुबाबदार आहात. तुम्हाला उत्तम वक्तृत्व लाभले आहे. तुम्ही बुद्धिमान आहात. स्मरणशक्ती चांगली आहे.स्वतंत्र विचारांचे आहात. उद्योगप्रिय आहात आणि सतत कामात मग्न असतात. गूढविषय तुम्हाला आवडतात. संशोधक वृत्ती असते. घर, मित्र, संसार यात तुम्ही गुरफटून जातात. अंतर्गत आवाजाची तुम्हाला देणगी आहे. तुमचे असणे इतरांना आवडते. तुम्ही इतरांना सहजासहजी समजून येत नाहीत. रूढी, परंपरा यांची बंधने तुम्ही पाळत नाहीत. स्वतःबद्दल तुम्हाला कमालीचा आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेतात. तुम्ही बोलण्यामध्ये अत्यंत चलाख आहात. जीवनात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक जाते. तुमचे कपडे उच्च दर्जाचे असतात. आणि तुम्ही सुगंधी द्रव्य वापरतात. तुमचा स्वभाव संशयी आहे.
व्यवसाय:- संगीतकार, सराफ, व्यापार, हॉटेल मॅनेजमेंट, बेकरी, आर्किटेक्ट, मेडिकल दुकान, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
रविवार, १५ जून २०२५. ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी/पंचमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्र नक्षत्र - श्रवण. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर. (एइन्द्र योग शांती)
"आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे."
मेष:- चंद्राचा शुक्राशी केंद्र योग आहे. नोकरीत काहीसा तणाव जाणवेल. नात्यातून समर्थन मिळेल. महिलांकडून गैरसमज होऊ शकतात. घशाची काळजी घ्या.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. भेटी गाठी होतील. जुने मित्र भेटतील. मन आनंदी राहील. चैनीवर खर्च कराल.
मिथुन:- उच्च दर्जाचे आध्यत्मिक लाभ होतील. खर्च वाढतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. गूढ उलगडतील.
कर्क:- बुद्धीचा योग्य वापर कराल. प्रगती साधाल. मात्र काही देणी राहून गेली यास्टील तर ती द्यावी लागतील. दानधर्म कराल.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. मोठी जोखीम नको. व्यवसाय वाढेल. मात्र फळ मिळण्यास वेळ लागेल.
कन्या:- शिक्षणात यश मिळेल. छोटी सहल घडेल. अधिकार वाढतील. गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या. मोठे व्यवहार करू नका.
तुळ:- दिवसाची सुरुवात बरी होणार आहे. नातेवाईक येतील. प्रवास घडतील. घरगुती समारंभ घडेल. महिलांचा काहीसा अपेक्षा भंग होऊ शकतो.
वृश्चिक:- व्यावसायिक यश लाभेल. मात्र परतावा मिळण्यास वेळ लागेल. उधारी वाढेल. भावंड भेटतील. पत्नीची साथ लाभेल.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. मित्र मंडळी आणि नात्यातून सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. संत सहवास लाभेल.
मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल. अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी आहे.
कुंभ:- दिवस फारसा आशादायक नाही. साचलेली कामे पूर्ण करा. खर्च वाढतील. कोणत्याही वादात पडू नका. अपघाताचे भय आहे.
मीन:- ठीकठाक दिवस आहे. प्रगती साध्य कराल. आरोग्य सुधारेल. स्वप्ने साकार होतील. संध्याकाळ खर्च वाढवणारी असेल. कलाकारांना अपेक्षा भंगाला सामोरे जावे लागेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)