असा असेल तुमचा आजचा दिवस : राशिभविष्य १२ जून
आज जन्मलेल्या व्यक्तीची वैशिष्टये आणि शेवटी आजचे राशिभविष्य:-
१२ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा कल सुखासीन जीवनाकडे आहे. तुम्हाला अधिकार आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. इतरांच्या कारस्थानाला तुम्ही बळी पडतात. अघळपघळ बोलणे तुम्हाला आवडत नाही.तुमच्या विचारात एक प्रकारचा ठामपणा असतो. विवाहानंतर तुमचा भाग्योदय होतो. ३९ वर्षांनंतर जीवनात स्थिरता प्राप्त होते. तुम्ही अनेकदा विनाकारण काळजी करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आवडते, तुम्ही न्यायी आहात. मोठ्याने बोलण्याची सवय आहे. तुम्ही अभ्यासू आहात व त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा करतात मात्र धर्माबद्दल तुम्हाला अभिमान आहे. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुमचे बुद्धिकौशल्य तुम्ही कृतीमध्ये उतरवतात. इतरांसाठी कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकारची हौस आहे. गूढ विद्यांची आवड आहे. विशेषत: तत्वज्ञान तुमच्या आवडीचा विषय आहे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. इतरांना तुमचा सहवास आवडतो. तुम्ही आशावादी आहात. तुम्ही काळजीपूर्वक पावले टाकतात. तुम्ही उत्तम सल्लागार आहात.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, न्यायाधीश, डॉक्टर, केमिस्ट, शिक्षक, लेखक, सचिव.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, लसण्या, अमेथिस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
गुरुवार, १२ जून २०२५. ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा/द्वितीया. शके १९४७, संवत २०८१. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज चांगला दिवस आहे"
नक्षत्र - मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु. (नक्षत्र गंडांत शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्राशी शुभ योग आहे. प्रणयरम्य दिवस आहे. भ्रमंती घडेल. मोठे करार आज नकोत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. चैनीसाठी खर्च कराल. सामाजिक कार्य करताना काळजी घ्या. विनाकारण प्रसिद्धीच्या मागे लागू नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. नाती सांभाळा. वादविवाद टाळा. मोठे निर्णय नकोत.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक लाभ वाढतील. व्यापारात यश मिळेल. प्रवासाचे नियोजन चुकू शकेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शेअर्स मध्ये चांगले लाभ मिळू शकतील. भेटवस्तू मिळतील. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. मात्र गृहकलह जाणवेल. कामानिमित्त केलेल्या प्रवासात त्रास होऊ शकतो.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज मंजूर होईल. सरकारी कामे पुढे सरकतील. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. भेटवस्तू मिळतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धन संपत्ती वाढेल. मोठी कामे पूर्ण होतील. मात्र शेअर्स मध्ये अंदाज चुकतील. संततीची काळजी वाटेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तूमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील कुलदेवतेची कृपा राहील. अडचणी दूर होतील. कनिष्ठ कर्मचाऱ्याकडून त्रास संभवतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिकूल दिवस आहे. मन उदास राहील. कष्टाचे फळ मिळेल. मात्र खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. मात्र संपत्ती बाबत महत्वाचे निर्णय आज नकोत.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दहावा चंद्र काही सुखद घटना अनुभवास देईन. आर्थिक बळ वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. व्यसने कटाक्षाने टाळा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.