असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २५ मार्च २०२६

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २५ मार्च २०२६
  • Positive News
  • मार्च 25 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, २५ मार्च २०२६
चैत्र शुक्ल सप्तमी 
पराभवनाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२
चंद्र – मिथुन राशीत
नक्षत्र – मृग / (संध्याकाळी ५.३४ नंतर) आर्द्रा
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)

२५ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

      तुमच्यावर नेपच्यून आणि गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमचे ध्येय आणि महत्वाकांक्षा उच्च प्रतीच्या असतात. तुम्ही परंपरागत रूढी पाळत नाहीत. मनातून तुम्ही अस्वस्थ असतात. उच्च विचार आणि व्यावहारिक दृष्टीकोन याचा तुमच्यात संगम असतो. त्यामुळे काहीवेळा विसंगती जाणवते. चाकोरीतून जाणे तुम्हाला पसंत नसते. सामर्थ्य आणि कमकुवतपणा याचा सतत अनुभव येतो. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुम्हाला परदेश बद्दल आकर्षण असते. तुमची ध्येयपूर्ती होते. सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणे तुम्हाला आवडत नाही. पैसा कसा कमवावा याचे तुम्हाला चांगले ज्ञान असते. तुम्हाला सतत बदल आवडतो. आवडते पुस्तक वाचण्यात तुम्ही रमून जातात. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार याची तुम्हाला पूर्ण जाणीव असते. स्वतःची खात्री झाल्याशिवाय तुम्ही कशावरही विश्वास ठेवत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही अंतिम परिणामाचा विचार करतात. मनाने मोकळे असून वागण्यात मुक्तपण असतो. स्वभाव आनंदी आणि उत्साह आहे मात्र अस्वस्थपणा वर नियंत्रण ठेवा. अहंकार टाळावा.   तुमचा स्वभाव विनोदी आणि मश्किलआहे. तुम्हाला चटकन लोकप्रियता मिळते. संवाद कौशल्य चांगले आहे. तुम्ही मनाने हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. ध्यानधारणा आणि कुलदेवतेची उपासना करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी चालूच असतात. तुम्ही मनापासून व्यक्त होत नाहीत त्यामुळे वरून शांत दिसले तरी आतून खळबळ चालू असते. तुम्ही स्वतंत्र वृत्तीचे आहात. इतरांची ढवळाढवळ तुम्हाला सहन होवोत नाही. तुम्ही साधे आणि नम्रआहात. मोठेपणा दाखवणे तुम्हाला आवडत नाही. तुम्ही शांतताप्रिय आहात. निर्णय घेताना तुम्हला वेळ लागतो. रहस्यकथा वाचणे तुम्हाला आवडते. तुम्ही धाडसी आहात आणि कोणत्याही परिस्थितीला तुम्ही हिमतीने तोंड देतात. तुम्ही नम्र असतात. तुम्ही प्रामाणिक आहात आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीशी तुम्ही निष्ठावान असतात. तुमचा स्वभाव चंचल आहे. नेपच्यून ग्रहाच्या प्रभावामुळे तुम्ही एखाद्या व्यसनाकडे वळू शकतात. तुमच्या वरील चंद्र प्रभावामुळे तुम्ही भोळे आणि हळवे होतात मात्र तुम्हाला समजणे कठीण असते असे नातेवाईकांना वाटते. तुम्हाला चांगले बोलता येते. कल्पना शक्ती अद्भुत असते. मात्र एकाच विषयात तुम्ही फार काळ रमत नाहीत. धरसोड वृत्तीमुळे नुकसान होऊ शकते. तुम्हाला जीवनात आराम आणि सर्व सोयी उपलब्ध होतात. नोकरी मिळाल्यास जीवनाला स्थैर्य प्राप्त होते. वयाच्या पन्नाशी नंतर तुम्हाला समाधान मिळते. जन्मस्थळ सोडून तुम्ही इतरत्र स्थायिक होतात. तुम्हाला आतल्या आजची देणगी आहे. 
      
         
शुभ रंग - हिरवा, पिवळा, जांभळा.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
दिशाशूल – पश्चिम दिशा
शुभ रंग – हिरवा, पिवळा, निळा
शुभ अंक – ५, २, ६

आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
रवी केंद्र चंद्र, रवी युती शनी, चंद्र केंद्र शनी, चंद्र केंद्र नेपच्यून.
सूर्याला दवणा वाहणे शुभ.

मेष (Aries)

सकाळचा वेळ अनुकूल आहे. कामे वेळेत पूर्ण होतील. दुपारनंतर संयम ठेवणे गरजेचे.
उपाय: सूर्याला दवणा अर्पण करा व आदित्य मंत्र जपा.

 वृषभ (Taurus)

आर्थिक बाबतीत लाभ होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. दुपारनंतर खर्च वाढू शकतो.
 उपाय: लक्ष्मी पूजन करा व पांढरी फुले अर्पण करा.

  मिथुन (Gemini)

तुमच्या राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. दुपारनंतर मानसिक ताण जाणवू शकतो.
 उपाय: गणपतीची पूजा करून दूर्वा अर्पण करा.

 कर्क (Cancer)

मन थोडे अस्थिर राहू शकते. गुप्त चिंता वाढू शकते. ध्यान-धारणा उपयुक्त ठरेल.
 उपाय: शिवलिंगावर जल व बिल्वपत्र अर्पण करा.

 सिंह (Leo)

मित्रांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग. दुपारनंतर संभ्रम वाढू शकतो.
 उपाय: सूर्याला अर्घ्य द्या व रामनाम जपा.

 कन्या (Virgo)

कार्यस्थळी यश मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील. दुपारनंतर कामात अडथळे येऊ शकतात.
 उपाय: हिरव्या मूग डाळीचे दान करा.

तुळ (Libra)

भाग्याची साथ मिळेल. प्रवास लाभदायक. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
उपाय: विष्णूला पिवळे फुल अर्पण करा.

 वृश्चिक (Scorpio)

संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या. अचानक बदल संभवतात.
 उपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा.

 धनु (Sagittarius)

संबंधांमध्ये गोडवा राहील. जोडीदाराची साथ मिळेल. दुपारनंतर गैरसमज टाळा.
 उपाय: केशर तिलक लावा व विष्णू पूजन करा.

 मकर (Capricorn)

कामात व्यस्त राहाल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
 उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.

 कुंभ (Aquarius)

सर्जनशील कामात यश मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.
 उपाय: गणपतीला दूर्वा अर्पण करा.

 मीन (Pisces)

घरगुती वातावरणात बदल होतील. आई-वडिलांची साथ मिळेल. मानसिक शांतता राखा.
 उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.

 आजचा शुभ विचार:
“विचारांची दिशा योग्य असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग सापडतो.”

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या