असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, 23 सप्टेंबर २०२६.

  असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, 23 सप्टेंबर २०२६.
  • Positive News
  • सप्टेंबर 23 2026

Share on  

  असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य बुधवार, 23 सप्टेंबर २०२६.

 २३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

     तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही महत्वाकांक्षी आहात. तुमच्या विषयाची सखोल माहिती घेतात. तुम्ही कायदाप्रेमी आहात. तुम्ही व्यावहारिक आणि ध्यात्मिक असून शांतताप्रिय आहात. तुम्हाला संगीत, वाङ्मयीन वाचन, प्रवास यांची आवड असते. तुमच्याकडे चांगले शब्दभांडार असते. त्याचाभाषण, लेखन यात उपयोग होतो. मोठेपणा, प्रतिष्ठा, प्रशंसा यास तुम्ही अधिक महत्व देतात. तुम्ही इतरांची परीक्षा चांट्कन आणि नेमकी करू शकतात. मनाने दुर्बल लोकांवर तुम्ही विजय मिळवतात. तुम्ही दिसायला चांगले असून अत्यंत लोकप्रिय आहात.  भिन्न लिंगी व्यक्तिमध्ये तुम्ही प्रिय असतात. तुम्ही इतरांना सहसा दुखावत नाहीत. कमी बोलणे तुम्हाला हिताचे वाटते. तुम्ही सहसा स्वतःची गुपिते इतरांना सांगत नाहीत. तुमची निरीक्षणशक्ती उत्तम आहे. तुम्हाला कोडी सोडवणे, लॉटरी, शेअर्स यांचा नाद असतो. लहान वयात एखादे प्रेमप्रकरण संभवते. तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा ठेवू शकतात. व्यावसायिक यश चांगले मिळते. गूढ विद्याची तुम्हाला आवड असते मात्र त्यासाठी अभ्यासाचे कष्ट घेण्याची तयारी नसते. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे.  तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते. *स्त्रियांना प्रसूतीबाबत काही अडचणी येऊ शकतात*.

व्यवसाय:-  वकील, मेडिकल, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*

बुधवार, २३ सप्टेंबर २०२६. भाद्रपद शुक्ल द्वादशी. वर्षा ऋतू. पराभव नाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

"आज शुभ दिवस आहे."

*वामन जयंती.*

चंद्र त्रिकोण बुध, चंद्र प्रतियुती गुरू.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दशम स्थानी शुभ ग्रहमान आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा वाढेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीत प्रगती होईल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दिवस चांगला आहे. मनासारख्या घटना घडतील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र ग्रहमान आहे. कामात काही अडथळे येऊ शकतात. मात्र प्रयत्न केल्यास यश मिळेल. नोकरीत वरचष्मा राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. भाग्योदयाची चिन्हे दिसतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रिय व्यक्तीचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) अर्थकारण मजबूत होईल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन करार होऊ शकतात. नोकरीत चांगल्या संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आनंददायी दिवस आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मात्र कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात वृद्धी होईल. कामातील अडथळे दूर होतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आरोग्याची काळजी घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रगतीचा वेग वाढेल. नवीन संधी चालून येतील. आत्मविश्वास वाढेल. जमीन-जुमल्याच्या व्यवहारातून लाभ होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शुभ दिवस आहे. कामात उत्साह राहील. बौद्धिक क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल. अकल्पित लाभ होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण जाणवू शकतो. व्यापारात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील मात्र खर्च वाढण्याची शक्यता आहे. संयमाने निर्णय घ्या.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या