रविवार, ४ मे २०२५. वैशाख शुक्ल सप्तमी/अष्टमी. वसंत/ग्रीष्म ऋतू, उत्तरायण. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते दुपारी ६.००
"आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे" भानू सप्तमी
नक्षत्र: पुष्य/ (दुपारी १२.५४ नंतर) आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कर्क. (गंड योग/विष्टी करण शांत)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
(मेष) रवी केंद्र (कर्क) चंद्र
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. नावलौकिक मिळेल. राजकीय यश प्राप्त होईल. शब्दास मान मिळेल. अहंकार टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) तृतीय स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. नात्यातून सहकार्य लाभेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आरोग्याबद्दल सजग व्हाल. मैदानी खेळांची आवड निर्माण होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मन आनंदी राहील. व्यवसायात भरघोस वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यय स्थानी चंद्र आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. खर्च वाढतील. आध्यत्मिक लाभ होतील. स्तुतिप्रियता वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) लाभ स्थानी चंद्र आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काही अप्रिय अनुभव येऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरीत सुखद अनुभव येतील. कामाचा ताण कमी होईल. मात्र वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आधुनिक तंत्रज्ञान वापरा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाबतीत आज चांगला दिवस आहे. नवीन संधी मिळतील. राजकीय क्षेत्रात मात्र जपून पावले टाका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अष्टम स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. काही कामे मार्गी लागतील. पारिवारिक कामाला प्राधान्य द्यावे लागेल. व्यसने टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिस्पर्धी गारद होतील. संतती बाबत चांगली बातमी समजेल. प्रतिष्ठा पणास लागेल. सामाजिक कामातून नवीन ओळखी होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. जमीन व्यवहारात यश मिळेल. अनुकूल रवी मानसिक सौख्य देईन. आरोग्य सांभाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. मात्र अनामिक भय दाटून येईन.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)