शनिवार, १० मे २०२५. वैशाख शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. उत्तरायण, सौर ग्रीष्म ऋतू, शके १९४७, संवत २०८१, क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज उत्तम दिवस आहे" घबाड संध्याकाळी ५.३० पर्यंत
नक्षत्र: चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या/ (दुपारी १.४२ नंतर) तुळ.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरुशी त्रिकोण योग तर बुधाशी प्रतियुती आहे. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. आर्थिक लाभ होतील व्यवसाय वाढेल. कठोर पावले उचलली जातील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) पर्यटन कराल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. उत्तरार्ध दिलासा देणारा आहे. बोलताना काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बुध अनुकूल आहे. नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभ्यासात मन रमेल. प्राणी प्रेम वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यावसायिक वाढ होईल. सरकारी नियमाचे काटेकोर पालन करा. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नेहमीची कामे चालू ठेवा. भागीदारी व्यवसायातून उत्तम लाभ होतील. प्रश्न सुटतील. उत्तरार्ध लाभदायक आहे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) राशीस्वामी अष्टम स्थानी आहे. कामाचे नियोजन उत्तम होईल. नवीन संधी चालून येतील. वारसा हक्कचे प्रश्न मार्गी लागतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुरुवात फारशी अनुकूल नाही. मात्र दुपार नंतर काही चांगल्या घटना घडतील. दानधर्म कराल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) काहीसा अनुकूल दिवस आहे. सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा दबदबा वाढेल. शब्दास मान मिळेल. विरोधक अचानक माघार घेतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. बढती मिळेल. लाभ वाढेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रगतीचा दिवस आहे. संपत्ती वाढेल. धनधान्य मिळेल. प्राणिप्रेमीना खुश खबर मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळ संथ वाटचालीची आहे. मात्र नंतर कामाचा वेग वाढेल. यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. घरगुती कामाला प्राधान्य द्याल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवसाची सुरुवात आशादायक आहे. कामे मार्गी लागतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. दुपार नंतर विश्रांती घेणे इष्ट! गैरसमज होईल, असे बोलणे टाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)