असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य
  • Positive News
  • मार्च 12 2026

Share on  

असा असेल तुमचा आजचा दिवस  :  राशिभविष्य गुरूवार, १२ मार्च २०२६.

फाल्गुन कृष्ण नवमी. विश्वासूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००

"सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे."

चंद्र नक्षत्र - मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.
(नक्षत्र गंडांत शांती करून घेणे)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र लाभ मंगळ योग असल्याने कार्यात यश मिळेल. नवम चंद्र आहे. भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) 
अष्टम चंद्र आहे. संमिश्र ग्रहमान आहे. काही अडचणी जाणवतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) सप्तम स्थानी चंद्र आहे. भागीदारीतून लाभ मिळतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) 
षष्ठ चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) पंचम चंद्र आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
 
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) चतुर्थ चंद्र आहे. घरगुती कामात वेळ जाईल. मालमत्ता विषयक चर्चा पुढे सरकेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) तृतीय स्थानी चंद्र आहे. मंगळशी शुभ योग आहे मात्र शुक्र, शनी आणि नेपच्यून शी अशुभ योग आहेत. व्यवसाय वाढेल मात्र आज बरीच मेहनत करावी लागेल. गैरसमज होऊ शकतात. प्रवासात त्रास संभवतो. महिलांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) द्वितीय चंद्र आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. महिलांना वारसा हक्काचे प्रश्न सतावतील. 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीच्या द्वादश भावात चंद्र आहे. खर्च वाढू शकतो. प्रवासाचे योग संभवतात. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) लाभ चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. नवीन संधी प्राप्त होतील.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दशम चंद्र आहे. नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन संधी प्राप्त होतील. प्रतिष्ठा वाढेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
???? 8087520521.

संबंधित बातम्या