असा असेल तुमचा आजचा दिवस

असा असेल तुमचा आजचा दिवस
  • Positive News
  • मार्च 18 2025

Share on  

मंगळवार, १८ मार्च २०२५. फाल्गुन कृष्ण चतुर्थी/पंचमी. उत्तरायण, शके १९४६. संवत २०८१. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

"आज संध्याकाळी ६.०० पर्यंत चांगला दिवस आहे" घबाड संध्याकाळी ५.५२ नंतर 

चंद्रनक्षत्र - स्वाती/ (संध्याकाळी ५.५२ नंतर) विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी -  तुळ. (व्यघात योग शांती) 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुळ राशीतील चंद्राचा मंगळाशी शुभ त्रिकोण योग आहे. भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. लेखकांना यश मिळेल. धाडस दाखवाल. सन्मान मिळतील. 
       
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यापार वाढेल. मन आनंदी राहील. संपत्ती वाढेल. यश मिळेल. शब्दाला मन मिळेल. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अधिकार वाढतील. अध्यात्मिक लाभ होतील. दबदबा वाढेल. अधिकाराचा योग्य वापर कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) जमीन खरेदी होईल. गृह सजावट कराल. धन संपत्ती वाढेल. शेतीतून लाभ होतील. 
    
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल मंगळ लक्ष्मी प्राप्ती करून देईन. आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. शत्रू त्रास कमी होईल.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीच्या ठिकाणी मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. वरिष्ठ खुश होतील.   

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. दूरचे प्रवास होतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. 
   
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. स्त्रियांना माहेरून संपत्ती मिळेल. मात्र खर्चात वाढ संभवते. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. नात्यातून लाभ होतील. कोर्टात यश मिळेल. शत्रू माघार घेतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गुप्त शत्रूंचा बंदोबस्त होईल. नवीन संधी चालून येतील. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. कामाचा ताण वाढेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) नवम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख लाभेल. संतती कडून चांगली बातमी समजेल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. प्रिय व्यक्तीकडून लाभ होतील. सामाजिक कार्यातून कौतुक होईल.   

 -  ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

संबंधित बातम्या