असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य २२ मार्च

असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य २२ मार्च
  • Positive News
  • मार्च 22 2025

Share on  

शनिवार, २२ मार्च २०२५. फाल्गुन कृष्ण अष्टमी. वसंत ऋतू. क्रोधी नाम संवत्सर, शके १९४६, संवत २०८१. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० 

"आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे" शुक्र पूर्व दर्शन, काळाष्टमी.

नक्षत्र - मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.  

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  बुध, शुक्र, रवी यांच्याशी चंद्राचा केंद्र योग आहे. चंद्र अनुकूल असला तरीही सांभाळून पावले टाका. मोठे करार आज नकोत. प्रवासात अडथळे येतील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रतिकूल दिवस आहे. सामाजिक कार्य करताना काळजी घ्या. विनाकारण प्रसिद्धीच्या मागे लागू नका. 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील.  मन आनंदी राहील. नाती सांभाळा. सरकारी कामात अडथळे येतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यापार वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक लाभ वाढतील. प्रवासाचे नियोजन चुकेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भेटवस्तू मिळतील. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. अचानक लाभ होतील. संततीची काळजी घ्या.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. मात्र गृहकलह जाणवेल.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज मंजूर होईल. सरकारी कामे पुढे सरकतील. मात्र महत्वाची कामे आज नकोत.   
  
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धन संपत्ती वाढेल. मोठी कामे पूर्ण होतील. मात्र लॉटरी मध्ये अंदाज चुकतील. 
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज तूमच्याच राशीत चंद्र आहे. मन प्रसन्न राहील कुलदेवतेची कृपा राहील. अडचणी दूर होतील. अति आत्मविश्वास टाळा. 
  
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रतिकूल दिवस आहे. मन उदास राहील. कष्टाचे फळ मिळेल. मात्र खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. तरीही सावधपणे पाऊले टाका.
  
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दहावा चंद्र काही सुखद घटना अनुभवास देईन. आर्थिक बळ वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. व्यसने कटाक्षाने टाळा.

- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

संबंधित बातम्या