असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : २६ मार्च

असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य :  २६ मार्च
  • Positive News
  • मार्च 26 2025

Share on  

बुधवार, २६ मार्च २०२५. फाल्गुन कृष्ण द्वादशी. वसंत ऋतू. शके १९४६, संवत २०८१. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ -  दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

"आज शुभ दिवस आहे"  भागवत एकादशी.

चंद्रनक्षत्र - धनिष्ठा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर/(दुपारी ३.१५ नंतर) कुंभ. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र हर्षल केंद्र योग आहे. संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. नेहमीपेक्षा वेगळा मार्ग दाखवा लागेल. विनाकारण खर्च होतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुरुवातीला अष्टम स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. शेतीतून लाभ होतील. संध्याकाळ आनंदाची.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सुरुवातीला अनुकूल दिवस आहे. अचानक लाभ होतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी आहे. नोकरीत कटकटीं होऊ शकतात.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नोकरीत उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाल. प्रवासात अडचणी येतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील.  यश मिळेल. व्यापार वाढेल. मात्र एखादी अप्रिय बातमी येऊ शकते.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. धाडस कराल. आर्थिक लाभ होतील. प्रेमात मात्र फसवणूक संभावते.
   
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आर्थिक भरभराट होईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक यश मिळेल. मेजवानी मिळेल. वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. प्रवासात अडथळे येतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक प्रांतात उत्तम यश लाभेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून लाभ होतील. गृहकलह होऊ शकतो.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सुरुवातीला व्यय स्थानी चंद्र आहे. प्रवास घडतील. खर्च वाढेल. मन:स्ताप संभवतो. संध्याकाळी मेजवानी मिळेल. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल. कलाकारांना यश मिळेल. अचानक एखादा खर्च वाढेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या