असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : २५ मार्च

असा असेल तुमचा आजचा दिवस राशिभविष्य : २५ मार्च
  • Positive News
  • मार्च 25 2025

Share on  

मंगळवार, २५ मार्च २०२५. फाल्गुन कृष्ण एकादशी. शके १९४६. संवत २०८१. वसंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

"आज शुभ दिवस आहे"  पापमोचनी एकादशी (स्मार्त)

नक्षत्र: श्रवण (चंद्र). आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर. 

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मन प्रसन्न राहील. चविष्ट भोजन मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक चिंता मिटतील. गोड बोलून कामे करून घ्या.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्याल. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. अर्थकारण सुधारेल. मात्र अनामिक भय दाटून येईल.  

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. प्रसन्न गुरूचा चांगला अनुभव येईल. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ वाढतील. सरकारी कामात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल. 
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. पंचम स्थानी चंद्र आहे. कामाचा पसारा वाढेल. आर्थिक लाभ होतील. सद्गुरू सेवेचा लाभ मिळेल.  

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस आहे. चतुर्थ स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील.  
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सामजिक कार्यात यश मिळेल. कनिष्ठ व्यक्तीची साथ लाभेल. स्पर्धेत विजयी व्हाल. नीतिमत्ता सांभाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल. खुश खबर मिळेल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढतील. दानधर्म करा. आध्यत्मिक उन्नतीसाठी चंगला दिवस आहे. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायातून लाभ होतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

संबंधित बातम्या